Bhavesh Bhinde : भिंडेच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ, भिंडेचे मासिक उत्पन्न कोटींच्या घरात

353
Bhavesh Bhinde : भिंडेच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ, भिंडेचे मासिक उत्पन्न कोटींच्या घरात
Bhavesh Bhinde : भिंडेच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ, भिंडेचे मासिक उत्पन्न कोटींच्या घरात
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना (Ghatkopar Hoarding Accident) प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेची (Bhavesh Bhinde) बुधवारी पोलीस कोठडी संपली, त्याला दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते.न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ केली आहे. भिंडे (Bhavesh Bhinde) याचा पोलीस कोठडीत बुधवारी १३ वा दिवस होता, या तेरा दिवसांच्या पोलीस कोठडीत भिंडे कडून तपासात कुठलेही सहकार्य करण्यात आले नसल्याचा आरोप पोलिसांनी न्यायालयात केला आहे.दरम्यान या गुन्ह्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने लोहमार्ग पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शहाजी निकम यांचा मंगळवारी (२८ मे)  जबाब नोंदवून घेतला आहे. (Bhavesh Bhinde)
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना (Ghatkopar Hoarding Accident) प्रकरणात अटक करण्यात आलेला इगो मीडिया प्रा.लिमिटेडचा मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) याची बुधवारी पोलीस कोठडी संपली, त्याला बुधवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यापूर्वी विशेष तपास पथकाने भिंडे (Bhavesh Bhinde) यांची दोन वेळा पोलीस कोठडी वाढवून घेतली होती. गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने भिंडे याच्याकडून बँकेच्या तपशिलासह अन्य कागदपत्रे हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच भिंडे यांच्या कंपनीत काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांचे जबाब नोंदविण्यात आले आहे.
भिंडेच्या चौकशीत मुंबई शहरात विविध ठिकाणी २६ ते २७ होर्डिंग भिंडेच्या कंपनीची लावण्यात आली असल्याचे उघडकीस आले आहे, भिंडे याला होर्डिंगच्या (Ghatkopar Hoarding Accident) माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे मासिक उत्पन्न सुरू होते. त्यामुळे भिंडेच्या (Bhavesh Bhinde) सहसंचालकाची तसेच अन्य सहभाग असलेल्या लोकांचा तपास करायचा असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. मात्र, आरोपी भावेश भिंडेच्या (Bhavesh Bhinde) वकिलाकडून भिंडेकडून सर्व कागदपत्रे जप्त केली असून आता पोलीस कोठडीची आवश्यता नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, किल्ला कोर्टाचे न्या. लक्ष्मीकांत पाढेन यांनी एका दिवसाची पोलीस कोठडी भिंडेला सुनावली आहे. तसेच भिंडे तांत्रिक दस्तावेज देण्यास पोलिसांना नकार देत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. (Bhavesh Bhinde)
(१३ मे) रोजी घाटकोपर येथील समता कॉलनी येथील पेट्रोल पंपाच्या लगत असलेल्या १२० बाय १४० कोसळल्याने १७ जणांचा मृत्यू झाला तर जवळपास ८० जण जखमी झाले होते. पंतनगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर (१७ मे) रोजी गुन्हे शाखेच्या कक्ष ७ कडे या प्रकरणाचा तपास वर्ग करण्यात आला. त्यानंतर आरोपी भावेश भिंडेला (Bhavesh Bhinde) राजस्थानातील उदयपूर (Udaipur) येथील (१७ मे) रोजी अटक करण्यात आली. त्यावेळी कोटणे (२६ मे) पर्यंत भिंडेला पोलीस कोठडी सुनावली होती. नंतर दुसऱ्या रिमांडच्या वेळी भिंडेला (२९ मे) पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज किल्ला न्यायालयाने भिंडेला (३० मे) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उद्या पुन्हा भावेश भिंडेला (Bhavesh Bhinde) किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.