राज्यासह देशभरात अंमली पदार्थांच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकत चालली आहे. अशीच एक घटना मध्यप्रदेश (Madhya Pradesh) येथे घडली आहे. मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये 1800 कोटी (Bhopal 1800 crore drugs) रुपयांची औषधे जप्त करण्यात आली आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने ATS गुजरात सोबत शनिवारी (०५ ऑक्टोबर) अंमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे. (Bhopal Drug Case)
भोपाळजवळील एका कारखान्यातून ही औषधे जप्त करण्यात आली आहेत. कटारा हिल्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बागरोडा गावातील औद्योगिक परिसरात हा कारखाना आहे. सन्याल बने, अमित प्रकाशचंद्र चतुर्वेदी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भोपाळ येथील अमित चतुर्वेदी आणि नाशिक, महाराष्ट्रातील सन्याल बने हे भोपाळच्या बागरोडा औद्योगिक परिसरात कारखान्याच्या नावाखाली मेफेड्रोन (MD Drugs) अंमली पदार्थाचे बेकायदेशीर उत्पादन आणि विक्रीमध्ये गुंतले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गुजरात एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे याआधी पंजाबमध्येही १० कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही औषधे दुबई आणि ब्रिटनमध्ये पुरवण्यासाठी एका मोठ्या सिंडिकेटद्वारे तयार केली जात होती. (Bhopal Drug Case)
(हेही वाचा – Dr Tara Bhawalkar: अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड)
भाड्याचा कारखान्यात ‘हे उद्योग’ चालू
आरोपी अमित प्रकाशचंद्र चतुर्वेदी याने ६ महिन्यांपूर्वी कारखाना भाड्याने घेतला होता. एमडी ड्रग्ज तयार करण्याचे काम येथे केले जात होते. दररोज सुमारे २५ किलो एमडी बनवले जात असल्याचे सांगितले जात आहे. गुजरातमधील सुरत येथे अटक करण्यात आलेल्या आरोपींशी संबंध आढळून आल्यानंतर भोपाळमध्ये कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एक सान्याल बने हा दोन महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. एका गुन्ह्यात गेल्या 5 वर्षांपासून तो मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात बंद होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो आरोपी अमित प्रकाशचंद्र चतुर्वेदीच्या संपर्कात आला.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community