मोदींना जवळून बघण्याच्या मोहापायी केले धाडस आणि घडले भलतेच

167

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जवळून बघायचे होते म्हणून एका लष्करी सैनिकाने खोटे ओळखपत्र बाळगले, तर दुसऱ्याने थेट परवाना असलेली पिस्तुल घेऊनच सभेच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या मुंबई पोलिसांनी या दोघांना वेळीच आवर घालून ताब्यात घेतले आणि दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

रामेश्वर दयाशंकर मिश्रा (३७) आणि श्रीकांत गायकर असे बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. रामेश्वर हे एरोलीत राहणारे असून पूर्वी ते एनएसजी कमांडो होते व २०१९ मध्ये त्यांनी एनएसजी सोडली होती आणि लष्करात भरती झाले. श्रीकांत गायकर यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असून ते भिवंडी येथे राहणारे असून भाजपाचे स्थानिक उपाध्यक्ष असल्याची माहिती बीकेसी पोलीस ठाण्याचे वपोनि. विश्राम अभ्यंकर यांनी दिली.

(हेही वाचा आता संजय राऊतांचे निकटवर्ती सुजित पाटकरांचा स्टॅम्प पेपर घोटाळा)

जुन्या ओळखपत्रात खाडाखोड

गुरुवारी पंतप्रधान मुंबईत येणार असून त्यांची बीकेसी येथे सभा असल्याचे कळताच रामेश्वर यांना नरेंद्र मोदी यांना जवळून बघायचे होते, त्यांना तो मोह आवरता आला नाही व त्यांनी चक्क पुन्हा एनएसजी कमांडो बनून त्यांचे जुने ओळखपत्रात खाडाखोड करून तारीख बदलली, सभेच्या ठिकाणी गेले. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी असलेल्या प्रवेशद्वारातून ते व्यासपीठाजवळ जाण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांना पोलिसानी हटकले आणि बीकेसी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांचे ओळखपत्र तपासले असता त्यात खाडाखोड केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

व्हीआयपी गेटचा वापर

दरम्यान श्रीकांत गायकर हे व्यावसायिक भाजपचे स्थानिक उपाध्यक्ष असून आपल्या नेत्याला जवळून बघण्यासाठी त्यांनी व्हीआयपी गेटचा वापर केला, मात्र मेटल डिटेक्टरमधून जात असताना संशयित म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे पिस्तुल मिळाले. त्यांच्याकडे त्या पिस्तुलचा परवाना आहे. त्यांचा हेतू केवळ मोदींना जवळून बघायचा असल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.