Bihar Businessman Murder Case: पुण्यातील मराठी व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या; नेमकं प्रकरण काय? वाचा

632
Bihar Businessman Murdered Case: पुण्यातील मराठी व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या; नेमकं प्रकरण काय? वाचा
Bihar Businessman Murdered Case: पुण्यातील मराठी व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या; नेमकं प्रकरण काय? वाचा
Bihar Businessman Murder Case: पुण्यातील एका व्यावसायिकाची बिहाराच्या पाटण्यात अपहरण करुन हत्या झाल्याची खळबळजनक घटना सोमवार, १४ एप्रिलला उघडकीस आली आहे. या प्रकरणात हल्लेखोरांनी त्यांचा मृतदेह जहानाबाद येथी रस्त्यात टाकला होता. जर वेळीच ओळख पटली नसती तर बिहार पोलीस (Bihar Police) बेवारस म्हणून त्यांचा अंत्यसंस्कार करणार होते अशी धक्कादायक माहीती समोर आली आहे. (Bihar Businessman Murder Case)

(हेही वाचा – Kanhaiya Kumar यांच्या विरोधात गुन्हा दाखल; भाजपाने का केली तक्रार?)

पुण्याच्या कोथरुड (Pune Kothrud) येथील व्यावसायिक लक्ष्मण साधू शिंदे (वय – ५५) यांना काही दिवसांपूर्वी कंपनीचे काही टुल्स आणि मशिनरी स्वस्तात देणार असे आमीष दाखवून ई-मेलद्वारे त्यांना बिहारच्या पाटण्यात बोलावून घेतले होते. त्यामुळे लक्ष्मण शिंदे विमानाने पाटणा विमानतळावर पोहचले त्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले. सोमवारी त्यांच्या मृतदेहाला पाटणा विमानतळ पोलिसांनी त्यांचा मृतदेह जहानाबाद जिल्ह्यातून ताब्यात घेतला. जहानाबाद पोलिसांना १२ एप्रिल रोजी लक्ष्मण साधू शिंदे यांचा मृतदेह घोषी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झुमकी तसेच मानपुर गावाच्या मध्ये रस्त्यावर पडलेला आढळा होता. परंतू मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती. 

मेहुण्यांनी केली तक्रार दाखल
व्यावसायिक लक्ष्मण साधु शिंदे हे पुणे येथील कोथरुडच्या एकलव्य कॉलेज जवळील इंद्रायणी को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी डी/01 येथे राहणारे होते. त्यांचे साडू विशाल लवाजी लोखंडे यांच्या लेखी तक्रारीनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ते पुणे पोलिसांसोबत पाटणा येथे आले होते. पाटणा पोलिसांनी सांगितले की ११ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता शिंदे इंडिगोच्या (Indigo Airlines) 6ई-653 विमानाने पुण्याहून पाटणाला (Pune Bihar Murder Case) आले होते. त्यानंतर त्यांनी पत्नीला फोन करुन सांगितले की शिवराज सागी नावाच्या व्यक्तीनी गाडी पाठविली आहे. त्याच वाहनाने झारखंडमध्ये कोल इंडिया कंपनीच्या कार्यालयात जाऊ असे त्यांनी सांगितले होते.

(हेही वाचा – Bala Nandgaonkar यांच्या पराभवात हातभार लावणाऱ्या नानांना शिवसेनेकडून बक्षिसी)

त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने कॉल उचलला
शिंदे यांची पत्नी रत्नप्रभा यांनी पोलिसांना सांगितले की ११ एप्रिलच्या रात्री साडे नऊ वाजता पतीच्या नंबरवर कॉल केला तर त्यांचा मोबाईल बंद झाला होता. एक तासांनी मोबाईल चालू झाला आणि मिस कॉल अलर्टचा मॅसेज पाहून त्यांना पुन्हा कॉल केला. यावेळी कोणी तरी दुसऱ्या व्यक्तीने फोन उचलला आणि शिंदे बाथरुमला गेलेत असे सांगितले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क केला असता तर फोनच बंद असल्याचे आढळले. दुसऱ्या दिवशी त्यांनी ही माहीती त्यांच्या भाऊजीं लोखंडे यांना दिली. त्यानंतर त्यांनी पुण्यात तक्रार दाखल केली. नालंदा येथील हिलसा येथे त्यांचे शेवटचे लोकेशन दिसत होते. पाटणा येथील आसपासच्या पोलीस ठाण्यांना शिंदे यांचे फोटो पाठविण्यात आले. त्यानंतर जहानाबाद पोलिसांनी (Jehanabad Police Station) संपर्क केल्याने हा प्रकार उघडकीस आला. सायबर भामट्यांनी शिंदे यांना स्वस्तात मशिनरी देतो सांगून त्यांचा पैशासाठी खून केल्याचा संशय आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.