बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) विद्या बालनच्या (Vidya Balan) नावाने बनावट जीमेल आणि इन्स्टाग्राम खाते तयार (Fake Account) करून फसवणूक करण्यात येत आहे. (Bollywood Actress)विद्या बालनने (Vidya Balan)स्वतःहून खार पोलीस ठाण्यात (Khar Police Station Case Register) तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बॉलिवूड(Bollywood Actress) मधील आघाडीची अभिनेत्री विद्या बालनचे (Vidya Balan)अज्ञात व्यक्तीकडून बोगस इन्स्टाग्राम आणि जीमेल खाते तयार (Fake Account) करण्यात आले आहे. तिच्या नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट जीमेल आणि इंस्टाग्राम खात्यावरून नोकरी ऑफर, बॉलिवूड मध्ये काम देण्याचे आश्वासन दिले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालन ही पती सिद्धार्थ कपूरसोबत (Bollywood Actress Vidya Balan Husband Sidharth Kapoor) वांद्रे पश्चिम येथील कार्टर रोड येथील सिल्व्हर सॅण्ड अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावर राहण्यास आहे.
(हेही वाचा- Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंवर त्यांच्याच जवळचा सहकारी अजय बरासकर यांच्याकडून गंभीर आरोप; जरांगे फसवणारा )
१६ फेब्रुवारी रोजी, तिला स्टाईलिश , फिल्म इंडस्ट्रीतील प्रणय याने संपर्क करून कळवले की, त्याला एका व्हॉट्सॲपवर क्रमांकावरून मेसेज आले आहेत. त्या मेसेजमध्ये ती विद्या बालन (Vidya Balan) असल्याचा दावा करण्यात आला आहे,आणि चर्चेनंतर मेसेज करणाऱ्या व्यक्तीने कामाच्या संधींचे आश्वासन दिले आहे.
मात्र विद्या बालनने(Vidya Balan) प्रणयला कळवले की तीने असा कुणालाही मेसेज केलेला नाही, आणि ज्या क्रमांकावरून मेसेज आला आहे तो मोबाईल क्रमांक तीचा नाही असे तीने प्रणय याला कळवले.त्यावेळी बालनच्या लक्षात आले की कोणीतरी तीच्या नावाचा वापर करून कामाबाबत लोकांशी संपर्क साधत आहे.( Vidya Balan)
विद्या बालनच्या(Bollywood Actress Vidya Balan) संपर्कात असलेल्या लोकांनी तीला कळवले की, तिच्या नावाचे इन्स्टाग्राम अकाउंट vidya.balan.pvt असे खाते व जीमेल अकाउंट [email protected] असे खाते तयार केलेले असुन त्यावरून ते फिल्म इंडस्ट्रीमधील व अन्य लोकांना संपर्क साधुन विद्या बालन असल्याचे भासवुन काम देण्याचे बाबत चर्चा करायची असल्याचे सांगुन फसवणुक करीत आहे.(Vidya Balan)
दरम्यान विद्या बालन(Vidya Balan) ची मॅनेजर अदिती संधू हिने २०जानेवारी रोजी खार पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जावरून खार पोलिसांनी १९ फेब्रुवारी रोजी विद्या बालनचा जबाब नोंदवून अनोळखी व्यक्ती विरुद्ध फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community