दिवाळीपूर्वी दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याने देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर अयोध्येचे राम मंदिर (Ayodhya Ram Mandir), उज्जैनचे महाकाल मंदिर (Ujjain Mahakal Temple) आणि तिरुपतीचे इस्कॉन या मंदिरावर दहशतवाद्यांचे लक्ष्य आहे. पोलिसांना ईमेल आणि पत्रांद्वारे मंदिरांवर दहशतवादी हल्ल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत, त्यानंतर मंदिरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मंदिरांच्या आत आणि बाहेर नजर ठेवली जात आहे. (Bomb Threat)
दिवाळीत अयोध्या अलर्ट मोडवर
दोन दिवसांनी अयोध्येत दिव्यांचा उत्सव साजरा होणार आहे. तब्बल 500 वर्षांनंतर अयोध्येतील रामलला मंदिरात हा उत्सव साजरा केला जाणार आहे. जगभरातून प्रभू रामाचे भक्त अयोध्येत पोहोचत आहेत. दीपोत्सवापूर्वी राम मंदिर रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाले आहे. मात्र या घटनेदरम्यान धमक्या आणि हल्ल्यांच्या भीतीने सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशभरातील मंदिरांना मिळणाऱ्या धमक्या.
एका संशयिताला अटक, मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त
दरम्यान, अयोध्या पोलिसांनी रफिक नावाच्या व्यक्तीला अटक केली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. त्याच्याकडून जप्त केलेले स्फोटक फटाके बनवण्यासाठी वापरले जात असले तरी सुरक्षा एजन्सी कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करत नाहीये. हे लक्षात घेऊन दीपोत्सवापूर्वी अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. पोलीस, पीएसी, यूपी एटीएस, यूपी एसटीएफ, स्पेशल कमांडो फोर्स आणि पॅरा मिलिटरी, आरएएफचे जवान अयोध्येच्या प्रत्येक कोपऱ्यात तैनात करण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Assembly Elections 2024 : ऐरोली विधानसभा मतदारसंघांत पाच लाख रोख रक्कम जप्त)
महाकाल मंदिरावर दहशतवादी हल्ला होण्याची धमकी
अयोध्येप्रमाणेच उज्जैनच्या महाकाल मंदिराचीही सुरक्षा वाढवण्यात आली असून, येथेही मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. राजस्थानच्या हनुमानगड रेल्वे स्थानकाच्या अधीक्षकांना एक पत्र प्राप्त झाले आहे. ज्यामध्ये 30 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबर रोजी महाकाल मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला जैश-ए-मोहम्मदचा एरिया कमांडर असल्याचे सांगितले आहे. यासोबतच राजस्थानातील अनेक मंदिरेही त्यांचे लक्ष्य आहेत.
दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर महाकाल मंदिराची सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे. मंदिराच्या नियंत्रण कक्षाकडून मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर लक्ष ठेवले जात आहे. मंदिरात येणाऱ्या लोकांना कडक सुरक्षा तपासणीनंतरच आत प्रवेश दिला जात आहे.
धमकीचे ईमेल कोण पाठवत आहे?
तिरुपती येथील तिरुमला देवस्थानमवर दहशतवादी हल्ल्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. रविवारी तिरुपतीच्या इस्कॉन मंदिराला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. इसिसचे दहशतवादी मंदिर उडवून देतील, अशी धमकी ईमेल पाठवणाऱ्याने दिली आहे, त्यानंतर मंदिर प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. माहिती मिळताच तिरुपती पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मंदिराची झडती घेतली. स्फोटकांचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकालाही पाचारण केले. मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्याची झडती घेण्यात आली, मात्र मंदिर परिसरातून कोणतेही स्फोटक किंवा आक्षेपार्ह साहित्य सापडले नाही.
(हेही वाचा – विद्यार्थ्यांना आर्य-द्रविड सिद्धांत शिकवण्याविषयी विचार करा; Madras High Court चे निर्देश)
दिवाळीपूर्वी मंदिरांना मिळणाऱ्या या धमक्यांबाबत सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. त्याचबरोबर धमकीचे ईमेल आणि पत्र पाठवणाऱ्यांचाही शोध घेतला जात आहे. कोणत्याही प्रकारची दहशदवादी कृत्य घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community