Bomb Threat : भारती विद्यापीठात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल; तपासणीअंती अफवा असल्याचे स्पष्ट 

86

राज्यात मागील काही दिवसांपासून विमान कंपन्यांपाठोपाठ रुग्णालय, महाविद्यालय यांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. परिणामी पुण्यातील कात्रज येथे भारती विद्यापीठात बॉम्ब (Bharti University bomb threat) ठेवल्याचा ई-मेल विद्यापीठ प्रशासनाला आल्याने एकच गोंधळ उडाला. यासंबधी सगळी माहिती त्यांनी तातडीने पोलिसांना दिल्यावर बॉम्ब शोधक पथकाने पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाल्यावर महाविद्यालय परिसरात सखोल तपासणी करण्यात आली. परंतु त्यानंतर सदर बाब अफवा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, याप्रकरणी संबंधित अनोळखी ईमेल धारकाविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bomb Threat)

याबाबत कॉलेजच्यावतीने डॉ.मंदार दत्तात्र्य करमरकर (वय-५५, रा.पर्वती दर्शन, पुणे) यांनी पोलिसांकडे अज्ञात ईमेल धारकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य यांना एका अनोळखी व्यक्तीने संबंधीत ईमेल पाठवला होता. त्यामध्ये तमिळनाडूमधील एका घटनेचा उल्लेख करुन भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्टेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची चेतावणी देण्यात आली. याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांना माहिती मिळाल्यावर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले. 

(हेही वाचा – Assembly Election 2024 : आदिवासीबहुल गडचिरोलीत बाप-लेक लढत लक्षवेधी!)

बॉम्ब शोधक (Bomb Threat) पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सर्व ठिकाणी तपासणी करत वस्तीगृहाची देखील झाडाझडती घेतली. याप्रकारामुळे महाविद्यालयात खळबळ उडून धावपळ झाली. पोलिसांनी ई-मेलची तपासणी केली असता तो विदेशातून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ईमेल मध्ये कोणती स्पष्ट धमकी नव्हती किंवा ईमेल करणाऱ्याचा उद्देश स्पष्ट कण्यात आला नव्हता, असे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील पाटील (API Swapnil Patil) करत आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.