दिल्लीतील चार शाळांना शुक्रवारी (13 डिसेंबर) सकाळी बॉम्बची धमकी (Delhi Bomb Threat) मिळाली आहे. दिल्लीच्या ईस्ट ऑफ कैलाश डीपीएस (East of Kailash DPS), सलवान स्कूल (Salwan School), मॉडर्न स्कूल (Modern School) आणि केंब्रिज स्कूलला (Cambridge School) ई-मेलद्वारे धमक्या आल्या आहेत. पोलिसांनी चारही शाळा गाठून तपास सुरू केला आहे. अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी या शाळांमध्ये तपासणीसाठी पोहोचले आहेत. मात्र, अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही. (Delhi Bomb Threat)
5 दिवसांपूर्वीही सुमारे 40 शाळांना उडवून देण्याची धमकी देणारा मेल आला होता, त्यानंतर मुलांना घरी पाठवण्यात आले होते. मेल पाठवणाऱ्याने बॉम्बचा स्फोट न करण्याच्या बदल्यात 30 हजार अमेरिकन डॉलर्स मागितले होते. दिल्लीतील शाळांना बॉम्बची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. मे 2024 मध्येही 150 हून अधिक शाळांमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमक्यांशी संबंधित ईमेल प्राप्त झाले होते. (Delhi Bomb Threat)
ईमेलमध्ये काय ? (Delhi Bomb Threat)
धमकीमध्ये म्हटले आहे की, ’13 डिसेंबर 2024 आणि 14 डिसेंबर 2024 रोजी तुमच्या शाळेत बॉम्बस्फोट होऊ शकतात. 14 डिसेंबरला शिक्षक-पालक बैठक नियोजित असून या दिवशी होणाऱ्या बॉम्बस्फोटाचा मोठा फायदा आहे. बॉम्बस्फोट 13 डिसेंबरला होणार की 14 डिसेंबरला होणार हे गुपित असले तरी आता बॉम्ब पेरण्यात आले आहेत हे मात्र निश्चित.’ (Delhi Bomb Threat)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community