14 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास एका व्यक्तीने मुंबई फायर ब्रिगेड कंट्रोलला फोन करून ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली. (Bomb Threat In Taj) ताज हॉटेलमध्ये बॉम्बचा स्फोट करणार असून तुम्हाला हवे ते करा, असे देखील तो या वेळी म्हणाला. यानंतर अग्निशमन दलाने मुंबई पोलिसांना तात्काळ माहिती दिली. पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने ताज हॉटेल परिसरात शोधाशोध केली. तासाभरानंतरही काहीही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर बीकेसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू ठेवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून तरूणावर गुन्हा दाखल केला आहे. (Bomb Threat In Taj)
(हेही वाचा – Navratri Festival 2023 : राज्यात सर्वत्र नवरात्रोत्सवाला आरंभ; कोल्हापूर, तुळजापूर, वणी, माहूर येथे भाविकांची गर्दी )
धरमपाल सिंह (36 वर्षे) असे तरुणाचे नाव आहे. तो नवी दिल्ली येथील लक्ष्मीनगर भागातील रहिवासी आहे. बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्यानंतर पोलिसांनी कॉलरचा नंबर तपासला. त्याने फायर ब्रिगेड कंट्रोलला कॉल करण्यापूर्वी 28 वेळा मुंबई पोलिस कंट्रोलला कॉल केल्याचे दिसून आले. मुंबईच्या कुलाबा पोलिसांनी कॉलरवर आयपीसीच्या कलम 506(2) अन्वये गुन्हा दाखल केला आणि कॉलरला दिल्लीतून अटक केली.
मुंबईत घातपाताची धमकी देण्याचे सत्र सातत्याने सुरू आहे. मुंबई पोलिसांना यावर्षी अनेक अधिक खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे कॉल आले आहेत. यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारा फोन आला होता. 6 ऑगस्ट रोजीही मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला होता. मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती संबंधित व्यक्तीने दिली होती. (Bomb Threat In Taj)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community