विमानांत बॉम्ब (Flight Bomb Threat) ठेवण्याच्या निनावी धमक्या काही थांबायचे नावच घेत नाहीत. गेल्या काही दिवसात हे प्रमाण वाढतच चालले आहे. 20 ऑक्टोबर रोजी इंडियन एअरलाइन्सच्या 25 फ्लाइट्सना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. यापूर्वी 19 ऑक्टोबर रोजी 30 हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. या आठवड्यात सुमारे 100 विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. दरम्यान, केंद्रीय राखीव पोलीस दलातील शाळा (CRPF School) दिल्लीतील 2 आणि हैदराबादमधील 1 शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ही धमकी तीन शाळांच्या व्यवस्थापनाला ईमेलद्वारे पाठवण्यात आली होती.
याशिवाय तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील चिन्नवेदमपट्टी आणि सर्वनमपट्टी या दोन खासगी शाळांनाही बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. मंगळवारी सकाळी बॉम्बशोधक पथक या सर्व शाळांमध्ये पोहोचले. शाळा रिकामी करून तपास केला जात आहे. मात्र, अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : नाना पटोले मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतूनच बाहेर!)
दरम्यान, 20 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास दिल्लीतील प्रशांत विहार भागातील सीआरपीएफ शाळेत हा स्फोट (CRPF school Bomb Blast) झाला. खलिस्तानी संघटनेने (Khalistani Organization) टेलिग्रामच्या माध्यमातून याची जबाबदारी घेतली. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, शाळेच्या भिंतीजवळ पॉलिथिन बॅगमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community