Bombay High Court वर काळ्या जादूची छाया? कोर्टाबाहेर सापडली लिंबू, मिरची आणि काळी बाहुली

74
Bombay High Court वर काळ्या जादूची छाया? कोर्टाबाहेर सापडली लिंबू, मिरची आणि काळी बाहुली
  • प्रतिनिधी 

मुंबई हायकोर्टाच्या (Bombay High Court) बाहेर असलेल्या फलकाजवळ जादूटोणा, काळ्या जादूसाठी लागणारे साहित्य आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा नक्की काय प्रकार आहे, कोणी केलं असावं हे शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून जादूटोण्याचे साहित्य पुरावा म्हणून जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यात हळद-कुंकु लावलेले लिंबू, नारळ, टाचण्या टोचलेली काळी बाहुली, इत्यादी वस्तू आढळून आलेल्या आहेत. हायकोर्टावर काळीजादू करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची कुजबुज न्यायालयाच्या आवारात सुरू आहे.

(हेही वाचा – वक्फ सुधारणा विधेयकावरून Chitra Wagh यांचा राऊतांना टोला; म्हणाल्या, मातोश्रीवर वक्फ बोर्डाची…)

मुंबई हायकोर्टाच्या (Bombay High Court) बाहेर मुंबई विद्यापीठाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या हायकोर्टाच्या नावाच्या फलकाजवळ असलेल्या एका झाडाजवळ गेल्या आठवड्यात वृत्तपत्राच्या आवरणात बंद करून ठेवण्यात आलेले काळ्याजादूचे साहित्य आढळून आले. वृत्तपत्राच्या आवरणामध्ये लिंबू, हळद-कुंकू, नारळ, टाचण्या टोचलेली काळी बाहुली, काळे तीळ, सिंदूर इत्यादी साहित्या मिळाले. हायकोर्टात जाणाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच न्यायालयाच्या आवारात कुजबुज सुरू झाली.

(हेही वाचा – Disha Salian प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आले; पण…)

दरम्यान न्यायालयातील वृत्तसंकलनासाठी असलेल्या एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने हे दृष्य कॅमेरात टिपून वृत्त प्रसारित केले. वृत्त प्रसारित होताच, हायकोर्ट (Bombay High Court) परिसरात काळ्या जादूच्या वस्तूंची चर्चा सुरू झाली. नक्की हा प्रकार कोणी व कशासाठी केला असावा असे प्रश्न प्रत्येक जण एकमेकांना विचारत होते. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. “या वस्तू कोणी ठेवल्या आहेत याचा सुगावा मिळविण्यासाठी आम्ही जवळपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासत आहोत,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्यांच्या शोध पथकांनी घटनास्थळी भेट दिली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे. आम्हाला संशय आहे की हा प्रकार पहाटे वेळेस घडला असावा आणि ते दोन ठिकाणी ठेवण्यात आल्याने ते दिवसा उशिरा सापडले,” असे पोलिस अधिकाऱ्याने पुढे सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.