मीरारोडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेत खाजगी हॉस्पिटला धमकीचे मेल (Mumbai Hospitals Threat Mail Meera Road Hospitals Threat Mail) सकाळी ९ वाजून ३० मिनिटांच्या दरम्यान आले आहेत. यापूर्वी मीरा-भाईंदर येथील हॉस्पिटलला धमकीचा मेल आला होता. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Meera Road Hospitals Threat Mail)
या हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी धाव घेतली असून पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. हा धमकीचा मेल (Threatening mail) नेमका कुठून आला, कोणी पाठवला, दहशतवादी संघटनांनी तर पाठवले नाही ना? सर्व बाजूने पोलिसांकडून तपास सुरू आहे. या धमकीचमुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Meera Road Hospitals Threat Mail)
(हेही वाचा – T20 World Cup, Super 8 : सुपर ८ मध्ये भारताचं वेळापत्रक कसं असेल?)
मिळालेल्या माहितीनुसार, मीरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलला धमकीचा मेल आला होता. यामध्ये रुग्णालयात स्फोटकं असल्याची माहिती या धमकीच्या मेलद्वारे देण्यात आली आहे. श्वान पथकासह पोलिसांनी या हॉस्पिटल्समध्ये धाव घेतली असून त्यांच्याकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. धमकीचा मेल आल्याची पुष्टी पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मीरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये स्फोटक असल्याचा धमकीचा मेल पाठवण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. मीरा-भाईंदर (Meera-Bhyander Police) आणि वसई -विरार (Vasai-Virar Police) पोलिसांना ईमेलवरून ही माहिती देण्यात आली. धमकीचा मेल येताच मीरा भाईंदर पोलिसांनी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये (Wockhardt Hospital) धाव घेतली. सध्या रुग्णालयामध्ये भीतीचे वातावरण आहे. ( Meera Road Hospitals Threat Mail)
(हेही वाचा – Bhandardara: सांदण दरी परिसरात पर्यटकांना ‘नो एन्ट्री’, वन विभागाने का घेतला निर्णय ?)
संबंधित ठिकाणी श्वान पथकासह पोलिसांच्या इतर पथकाकडून हॉस्पिटलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. या मेलमुळे एकच खळबळ उडाली असून मोठ्या संख्येने पोलिस हॉस्पिटल परिसरात आले आहेत. हॉस्पिटलमधील रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Meera Road Hospitals Threat Mail)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community