#BOYCOTTSonyTV ट्रेंड सुरु; ‘सोनी’च्या ‘क्राईम पेट्रोल’मध्ये आफताब बनला हिंदू, श्रद्धा बनली ख्रिश्चन

धर्मांध मानसिकतेच्या आफताबने हिंदू युवती श्रद्धा वालकर हिच्या शरीराचे ३५ तुकडे करून तिची निर्घृण हत्या केली. आता या घटनेवर सोनी टीव्हीच्या क्राईम पेट्रोल या मालिकेत श्रद्धा मर्डर केसवर विशेष भाग बनवण्यात आला. त्यामध्ये मात्र धक्कादायक बदल करण्यात आला. त्यामध्ये आरोपी आफताब याला  मिहिर असे नाव देऊन हिंदू दाखवण्यात आले आहे, तर श्रद्धा हिला ऍना फर्नांडिस असे ख्रिश्चन दाखवण्यात आले आहे. यामध्ये अफताबला जाणीवपूर्वक मुसलमान दाखवण्यात आले नाही, यामुळे सोशल मीडियात प्रचंड संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याचे थेट संबंध आता सोनी वाहिनीचे बिझनेस हेड दानिश खान यांच्याशी जोडण्यात आले आहेत. दानिश खान हे मुसलमान असल्याने त्यांनी हा खोडसाळपणा केला असल्याचा आरोप नेटकरी करू लागले आहेत, तसेच #BOYCOTTSonyTV हे ट्रेंड सुरु झाला आहे.

काय दाखवले आहे एपिसोडमध्ये? 

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. यात धर्मांध मुसलमान युवक आफताब पूनावालावर श्रद्धाच्या हत्येचा आरोप आहे. आरोपीने श्रद्धाचे 35 तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. याप्रकरणी पोलिसांचा तपास अद्याप सुरुच आहे. दरम्यान, सोनी टीव्हीच्या क्राईम पेट्रोल शोमध्ये अहमदाबाद-पुणे मर्डर नावाचा एपिसोड प्रसारित झाला आहे. हे आफताब आणि श्रद्धाच्या कथेचे नाट्यमय रुपांतर असल्याचा दावा केला जात आहे. हा भाग प्रसारित केल्यानंतर शो वादात सापडला आहे.

(हेही वाचा काश्मिरी पोलिसांसाठी वर्ष २०२२ गेले शांतीपूर्ण; २०२३ चे लक्ष्य काय असणार?)

#BOYCOTTSonyTV ट्विटरवर ट्रेंड करत आहे. शोच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याप्रसारित भागांच्या अनेक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. शोमध्ये श्रद्धा आणि आफताबचा धर्म बदलण्यात आल्याचे लोकांचे म्हणणे आहे. श्रद्धा ही अॅना फर्नांडिस या ख्रिश्चन मुलीच्या भूमिकेत आहे, तर तिला मारणारा आफताब मिहिर नावाचा हिंदू तरुण दाखवला आहे. तसेच तो व्यवसायाने योगा शिक्षक दाखवण्यात आला आहे.

एपिसोडमध्ये मिहिरची आई एक धार्मिक स्त्री आहे, जी मंदिरात जाऊन पूजा करते. नंतर, मिहीर आणि अॅना एका मंदिरात लग्न करतात आणि पुण्याला शिफ्ट होतात. तर श्रद्धा आणि आफताब दिल्लीत लिव्ह इनमध्ये राहत होते. लग्नानंतर मिहीर अॅनाशी भांडू लागतो. एके दिवशी भांडण झाल्यावर मिहिर अॅनाला मारतो, तो अॅनाचा मृतदेह बाथरूममध्ये घेऊन जातो आणि धारदार शस्त्राने तिचे तुकडे करुन रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. मृत शरीराचे तुकडे ठेवलेल्या फ्रीजमधून मिहीर पाणी काढतो आणि त्याला काही फरक पडत नसल्याप्रमाणे पितो. असाच प्रकार श्रद्धाच्या बाबतीतही झाला आहे. त्यामुळे शोवर लोक नाराज झाले. हा एपिसोड 27 डिसेंबरला दाखवण्यात आला होता. या शोमध्ये हिंदू धर्माला लक्ष्य करण्यात आल्याचे ट्विटरवरील यूजर्सचे म्हणणे आहे.

(हेही वाचा धक्कादायक! पुरातत्व विभागाच्या नियंत्रणाखालील देशातील 50 राष्ट्रीय स्मारके गायब!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here