Brazil Plane Crash: ब्राझीलमध्ये ६२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, सर्व प्रवाशांचा मृत्यू

123
Brazil Plane Crash: ब्राझीलमध्ये ६२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, सर्व प्रवाशांचा मृत्यू
Brazil Plane Crash: ब्राझीलमध्ये ६२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, सर्व प्रवाशांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये विमानाला भीषण अपघात (Brazil Plane Crash) झाला आहे. साओ पाऊलोच्या सीमावर्ती भागात विमान अपघातग्रस्त झालं आहे. या विमानात ६२ जण होते. ब्राझीलच्या नागरी सुरक्षा विभागानं अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विमान कोसळल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं आहे. या अपघातात विमानातील सगळ्या प्रवाशांना मृत्यू झाल्याची माहिती ब्राझीलचे अध्यक्ष लूला डी सिल्वा यांना दिली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करत नागरिकांना एक मिनिटाचं मौन राखून मृतांना श्रद्धांजली वाहण्याचं आवाहन केलं आहे.

(हेही वाचा –Kolhapur : ‘केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहिल’, मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही)

या विमानात ५८ प्रवासी आणि ४ कर्मचारी होते. अपघातात ते सगळे मृत्यूमुखी पडले आहेत. विमान अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात विमान एखाद्या कागदाच्या पानासारखं हवेत फिरताना दिसत आहे. विमान जमिनीवर कोसळताच सर्वत्र काळा धूर पसरताना दिसतो. विमान जमीनदोस्त होताच त्याला आग लागते. (Brazil Plane Crash)

(हेही वाचा –दादर रेल्वे स्टेशन पुन्हा हादरलं! Nandigram Express च्या शौचालयात सापडला गळफास लावलेला मृतदेह)

एका झाडाजवळ विमान कोसळलं. विमान कोसळताच त्यानं पेट घेतला. द गार्डियनच्या वृत्तानुसार, हे विमान वोपास लिन्हास एरियासकडून चालवण्यात येत होतं. पराना राज्यातील कास्कावेलमधून ते साओ पाऊलोतील गुआरुल्होसला जात होतं. फ्लाईट रडार संकेतस्थळानं दिलेल्या माहितीनुसार, विमान जमिनीपासून १७ हजार फूट उंचीवर होतं. दोन मिनिटांत ते ४ हजार फूट खाली आलं. त्यानंतर त्याचा जीपीएस सिग्नल नकाशावर दिसायचा बंद झाला. या विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आलेले आहेत. (Brazil Plane Crash)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.