Breakdown Accident : विक्रोळीत ब्रेकडाऊनमुळे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू; पावसाळ्यात वाहनचालकांनी काय काळजी घ्यावी?

187
Breakdown Accident : विक्रोळीत ब्रेकडाऊनमुळे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू; पावसाळ्यात वाहनचालकांनी काय काळजी घ्यावी?

पावसाळ्यात वाहने ब्रेकडाऊन होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात, ब्रेकडाऊनमुळे वाहने जागीच थांबत असल्यामुळे रस्ते अपघात होण्याची शक्यता नाकारता येत आहे. मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्ग विक्रोळी येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ब्रेकडाऊन झालेल्या वाहनांमुळे दोन मोटरसायकलस्वारांना आपले प्राण गमावावे लागल्याच्या घटना गेल्या आठवड्यात घडल्या. शुक्रवारी सकाळी घडलेल्या पहिल्या घटनेत, विक्रोळी पूर्व येथे राहणारा गौतम कुमार (२८) हा कराटे शिक्षक घाटकोपर येथे आपल्या कराटे क्लासला मोटारसायकलवरून जात असताना विक्रोळी येथील कन्नमवार नगर, पूर्व द्रुतगती महामार्ग उभा असलेल्या डंपरवर गौतम कुमार यांची मोटारसायकल धडकली, या भीषण धडकेत गौतम कुमार यांचा मृत्यू झाला. (Breakdown Accident)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर उभा असलेल्या डंपरचे ब्रेकडाऊन झाले, व डंपर रस्त्यात उभा होता. चालकाने डंपरची कुठलीही सुरक्षा उपाययोजना तसेच कोणताही रिफ्लेक्टर त्रिकोण न लावल्यामुळे किंवा टेल लाइट चालू न ठेवल्यामुळे, अपघात झाला,” अशी माहिती पोलिसांनी दिली. विक्रोळी पोलीसांनी डंपर चालकावर भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कलम १०६ (१) (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि २८५ (सार्वजनिक मार्गात धोका किंवा अडथळा) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. गौतम कुमार यांच्या पत्नीने दहा दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता, कन्यारत्न झाल्यामुळे गौतम कुमार आणि कुटुंब खूप आनंदी होते, त्यातच ही दुर्देवी घटना घडली. (Breakdown Accident)

(हेही वाचा – Cement Concrete Road : वांद्रे पश्चिम रंगशारदा परिसरातील रस्ते अडकले वादात?, निविदा प्रक्रियेवर संशय)

दुसऱ्या घटनेत, कोपरी येथे राहणारे अजय दुराईराज कौंदर (३२) हा त्याचा मित्र प्रशांत बोकाडे याच्यासोबत घाटकोपरला कामासाठी जात असताना पंत नगर पुलाजवळ त्यांची स्कूटर रस्त्यावर उभ्या असलेल्या पिकअप जीपवर धडकली. पोलिसांनी सांगितले की हा अपघात शुक्रवारी रात्री उशिरा झाला अजयने स्कूटरला पिक-अप ट्रकला धडक दिली आणि त्याचा मित्र दूर फेकला गेला, किरकोळ दुखापत होऊन तो बचावला.आम्ही नंतर शुक्रवारी रात्री पिक-अप चालकाच्या विरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याबद्दल गुन्हा दाखल केला, ज्याने मुसळधार पावसामुळे वाहन निकामी झाल्यानंतर थांबवले होते. त्याने, तथापि, इतर वाहनचालकांना ब्रेकडाउन बद्दल सावध करणारा कोणताही सावधगिरीचा त्रिकोण लावला नाही आणि पार्किंगचे दिवे चालू ठेवले नाहीत, ज्यामुळे दुचाकीस्वार त्यात आदळला, परिणामी त्याचा मृत्यू झाला,” पोलीस अधिकारी म्हणाले. (Breakdown Accident)

ब्रेकडाऊन म्हणजे काय?

ब्रेकडाऊन म्हणजे मोटार वाहनाचे यांत्रिक बिघाड, ज्यामुळे त्याचे कार्य विस्कळीत होते आणि ते ऑपरेट करणे धोकादायक बनते. काही प्रकरणांमध्ये, वाहन पूर्णपणे काम करणे थांबवते. विघटन विविध कारणांमुळे होऊ शकते आणि वेळेवर देखभाल करून ते टाळले जाऊ शकते. (Breakdown Accident)

काळजी कशी घ्याल? 

एखादे वाहन ब्रेकडाऊन झाल्यावर त्या वाहनांच्या अवतीभोवती इतर वाहन चालकांना दिसेल असे त्रिकोणी रिफ्लेक्टर लावावे, ब्रेकडाऊन झालेल्या वाहनांचे सिग्नल लाईट तसेच टेल लाईट सुरू करून ठेवावे, त्यामुळे पाठमागून येणाऱ्या वाहन चालकांना वाहन रस्त्यात उभे असल्याचे समजेल आणि तो वाहन चालक आपल्या वाहनांचा वेग कमी करतील, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता कमी असते. इतर वाहन चालकांनी देखील दुरूनच ब्रेकडाऊन झालेल्या वाहनांच्या अवतीभवती असलेले त्रिकोणी रिफ्लेक्टर आणि सिग्नल आणि टेल लाईट बघून आपल्या वाहनांचा वेग कमी करावे व पाठीमागून येणाऱ्या वाहनांना सावध करण्यासाठी स्वतःच्या वाहनांची पार्किंग लाईट सुरू करावी जेणेकरून मागच्या वाहन चालक सावध होऊन आपल्या वाहनांची गती कमी करू शकेल आणि अपघात टाळता येऊ शकते असे एका वाहतूक पोलीस अधिकारी यांनी सांगितले. (Breakdown Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.