गुन्ह्यात मदत करण्यासाठी अटकेत असलेल्या आरोपीकडे लाच स्वरूपात सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोनची मागणी करणाऱ्या आंबोली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच दादर पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध ५० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलीस दलातील एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. (Bribery)
राजश्री शिंत्रे असे महिला उपनिरीक्षकाचे नाव आहे. मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात शिंत्रे ह्या पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होत्या. आंबोली पोलिस ठाण्यात एका केबल व्यवसायिकावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंत्रे यांच्याकडे होता. या गुन्ह्यात अटक आरोपीला मदत करण्यासाठी शिंत्रे यांनी आरोपीकडे सॅमसंग कंपनीचा लेटेस्ट मॉडेलच्या मोबाईल फोनची मागणी केली. अटक आरोपीच्या कुटुंबांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. (Bribery)
(हेही वाचा – Demat Accounts SEBI Crackdown : गुंतवणुकीचे सल्ले देणाऱ्यांनी सोशल मीडिया खात्यांची नियमित माहिती सेबीला देणं बंधनकारक)
बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आंबोली पोलीस ठाण्यात सापळा रचून लाच म्हणून मोबाईल फोनची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक राजश्री शिंत्रे यांना ताब्यात घेऊन भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६ मे रोजी दादर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ईश्वर जगदाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जगदाळे यांनी गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी आणि दोषारोप पत्र सादर करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. (Bribery)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community