कर्ज बुडवून परदेशात पळालेला उद्योगपती नीरव मोदी याच्या 39 मालमत्ता जप्त करण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे निरव मोदीचे काळाघोडा येथील रिदम हाऊस, अलिबामधील बंगला आणि 22 महागड्या कार जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ईडीने नीरव मोदी याच्या 929 कोटींच्या 48 मालमत्ता जप्त करण्याच्या परवानगीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यापैकी 39 मालमत्ता जप्त करण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे.
पंजाब नॅशनल बॅंकेत 13 हजार 500 कोटी रुपयांचा घोटाळा नीरव मोदीने केला आहे. कर्ज बुडवून देशाबाहेर पळालेल्या नीरव मोदीच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेवर सध्या लंडनच्या न्यायालयात खटला सुरु आहे.
( हेही वाचा: PFI च्या पदाधिका-यांसह तिघांना पनवेल येथून अटक )
नीरव मोदी ब्रिटनच्या तुरुंगात बंद
नीरव मोदी सध्या ब्रिटनच्या तुरुंगात बंद आहे. नीरव मोदीने त्याचा काका मेहुल चोक्सी याच्यासोबत मिळून पंजाब नॅशनल बॅंकेत हेराफेरी केली होती. नीरव मोदी गीतांजली या ब्रॅंड नावाने हि-याचा व्यवसाय करत आहे. नीरव मोदीशिवाय मद्य व्यवसायिक विजय माल्या, आयपीएलचे संस्थापक ललित मोदी हेही यावेळी ब्रिटनमध्ये आहेत. भारत सरकारने यांना फरार घोषित केले आहे.
Join Our WhatsApp Community