New India Co-op Bank Scam : राजकीय पक्षाच्या माजी सचिवाच्या भावाला बँक घोटाळा प्रकरणी अटक

50
New India Co-op Bank Scam : राजकीय पक्षाच्या माजी सचिवाच्या भावाला बँक घोटाळा प्रकरणी अटक
New India Co-op Bank Scam : राजकीय पक्षाच्या माजी सचिवाच्या भावाला बँक घोटाळा प्रकरणी अटक

न्यू इंडिया को.ऑप.बँक घोटाळा (New India Co-op Bank Scam) प्रकरणात एका राजकीय पार्टीच्या माजी महाराष्ट्र सचिव हैदर आझम (Hyder Aazam) यांचे बंधू जावेद आझमला (Javed Aazam) मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक केली आहे.

१२ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank) अधिकाऱ्यांच्या पथकाने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेची (New India Co-op Bank Scam) पाहणी केली आणि १२२ कोटी रुपयांची रोकड गायब झाल्याचे आढळून आले. आतापर्यंत, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने बँकेचे महाव्यवस्थापक आणि खाते प्रमुख हितेश मेहता (Hitesh Mehta), बँकेचे माजी सीईओ अभिमन्यू भोयन, विकासक धर्मेश पौण, मालाडचे व्यापारी उन्नाथन अरुणाचलम आणि त्यांचा मुलगा मनोहर आणि नागरी कंत्राटदार कपिल देडीया यांना अटक केली आहे. (New India Co-op Bank Scam)

(हेही वाचा – Nagpur हून छत्रपती संभाजीनगर, बेळगावला जाणारी विमानसेवा होणार बंद)

पोलिस सूत्रांनी सांगितले की त्यांना ११ मार्च रोजी या प्रकरणातील मुख्य आरोपी मेहता यांच्यावर केलेल्या लाय-डिटेक्टर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. आदल्या दिवशी अटक करण्यात आलेल्या उन्नाथनच्या चौकशीदरम्यान जावेदचे नाव समोर आल्यानंतर ईओडब्ल्यूने सोमवारी त्याला चौकशीसाठी बोलावले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्नाथनने त्याच्या चौकशीत सांगितले की त्याने जावेदला त्याच्या इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायासाठी १८ कोटी रुपये दिले. (New India Co-op Bank Scam)

ईओडब्ल्यू आता जावेदच्या (Javed Aazam) आर्थिक व्यवहारांची आणि त्याच्या राजकीय संबंधांमुळे निधीचा गैरवापर लपविण्यात मदत झाली का याची चौकशी करत आहे. २०२२ मध्ये, हैदर यांची पत्नी रेश्मा हिच्यावर बांगलादेशी नागरिक असल्याचा आणि भारतीय पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करण्यात आला तेव्हा ते वादात सापडले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.