BSF जवानाची निर्घृण हत्या; हत्येप्रकरणी 7 जण अटकेत

136

गुजरातमध्ये BSF जवानाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. गुजरातमधील नाडियाद जिल्ह्यात एका बीएसएफ जवानाने आपल्या मुलीचा अश्लील व्हिडिओ करणा-यांचा विरोध केला असता, ही घटना घडली. नडियाचे डीएसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेलजीभाई वाघेला आणि त्यांचा मुलगा काही नातेवाईकांसह आरोपी शैलेश जाधवाच्या घरी गेले होते, यादरम्यान हा वाद झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या घरी पोहोचल्यावर दोन्ही गटामध्ये भांडण झाले असता, आरोपीचे वडील, काका व इतर कुटुंबीयांनी मृत बीएसएफ जवान वाघेला यांच्यावर हल्ला केला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

( हेही वाचा: DRI ने जप्त केले 25 किलो मेफेड्रोन )

BSF जवानाच्या हत्येप्रकरणी 7 जण अटकेत

DSP VR बाजपेयी यांनी BSF जवानाच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आले असल्याची माहिती दिली. डीएसपी यांनी सांगितले की, 24 डिसेंबर रोजी नाडियादमध्ये मुलीने अश्लील व्हिडिओ काढण्याला विरोध केल्यामुळे मुलीचे वडील बीएसएफ जवानाची हत्या करण्यात आली होती. यादरम्यान, पीडित जवानाचा मुलगाही जखमी झाला, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बीएसएफ जवान मेलजीभाई वाघेला हत्या केल्याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.