देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा शिवारातील अफूच्या शेतीवर शनिवार २२ फेब्रुवारी रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने धाड (Buldhana Crime) घातली. सुमारे १२ कोटी ६० लाख रूपये किंमतीची प्रतिबंधित अफू जप्त करण्यात आला. शेतमालक संतोष मधुकर सानप (Santosh Madhukar Sanap) (वय ४९, रा. अंढेरा) याला गुन्हा दाखल करून अटक केली आहे. (Buldhana Crime)
हेही वाचा-Natco Pharma : नॅटको फार्मा आपल्या वर्षातील नीच्चांकी पातळीवर, शेअरमध्ये घसरण का झाली?
१२ गुंठे क्षेत्रातून जप्त केलेल्या या अफू पिकाचे वजन १५ क्विंटल ७२ किलो एवढे आहे. प्रतिबंधित अंमली पदार्थाच्या साठ्यावर बुलढाणा एलसीबीने केलेली अलिकडच्या काळातील सर्वात मोठी कारवाई आहे. अफू पिकाची लागवड आढळलेले शेत हे अंढेरा पोलीस स्टेशनपासून अवघ्या ४ किमी. अंतरावर आहे. मात्र अंढेरा पोलीस याबाबत अनभिज्ञ कसे? याविषयी पोलीस वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. बुलढाणा एलसीबीला या अफूच्या शेतीविषयी गुप्त मिळाल्यानंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, एपीआय आशिष रोही यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने अफू शेतीवर धाड घालून कारवाई केली. (Buldhana Crime)
प्रकरणाचा बारकाईने तपास
या प्रकरणात परिसरातील आणखी कोणी सहभागी आहेत काय, याचा तपास सध्या स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. प्रकरणात अंढेरा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) आणि १८(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास देऊळगाव राजाच्या एसडीपीचे मनिषा कदम यांच्या कारभाराखाली चालवला जात आहे. (Buldhana Crime)
अफूवर ग्रीन नेट लावून घेतली काळजी
शेताच्या मधोमध १६ गुंठे जागेत अफूची लागवड करुन संवर्धन केले. लागवड केलेल्या अफूची लोकांना जाणीव होऊ नये, म्हणून चारी बाजूंनी मका पिकाची लागवड केली. तसेच अफूची जागा कोणालाही दिसू नये म्हणून त्यावर ग्रीन नेटने आच्छादन केलेले होते. (Buldhana Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community