पोलीस भरती दरम्यान सोळाशे मीटर धावताना एका उमेदवारांचा मैदानात कोसळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी दुपारी मुंबईतील कलिना युनिव्हर्सिटी येथे घडली. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.
( हेही वाचा : जे.जे. मधील परिचारिका शिक्षण संस्था वैद्यकीय विभागात विलीन करण्याच्या निर्णयाला विरोध; अन्यथा आंदोलनाचा इशारा )
गणेश उत्तम उगले (२६) असे या उमेदवाराचे नाव आहे. गणेश उगले हा वाशिम जिल्ह्यातील काजल्मबा या गावातील होता. कलिना युनिव्हर्सिटी येथील मैदानात मुंबई पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरु आहे, शुक्रवारी गणेश हा भरतीसाठी वाशिम जिल्ह्यातून आला होता. सोळाशे मीटर धावण्याच्या मैदानी चाचणी दरम्यान गणेश हा मैदानात अचानक कोसळला, तेथील पोलिसांनी त्याला तात्काळ व्ही एन देसाई हॉस्पिटल येथे आणले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. गणेशच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून बीकेसी पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे याप्रकरणी सध्या अधिक तपास सुरु आहे.
Join Our WhatsApp Community