Sion Car Accident : सायन पुलानजीक अपघातानंतर मोटारीने घेतला पेट; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

या आगीत मोटारीतील पाच जण गंभीर जखमी होऊन त्यापैकी दोन भावांचा मृत्यु झाला आहे.

269

सायन येथे सोमवार, ११ सप्टेंबर रोजी पहाटे भरधाव वेगात चेंबूरच्या दिशेने निघालेल्या एका मोटारीला अपघात होताच मोटारीने जागीच पेट घेतला. या आगीत मोटारीतील पाच जण गंभीर जखमी होऊन त्यापैकी दोन भावांचा मृत्यु झाला आहे. तिघे जण गंभीर जखमी असून त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सायन पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. अपघातात ठार झालेले आणि जखमी हे मानखुर्द मंडाळा येथील अणुशक्ती नगर येथे राहणारे आहेत.

प्रेम वाघेला (१८) आणि अजय वाघेला (२०) अशी अपघातात मृत झालेल्या भावांची नावे आहेत. हरीश कदम (१९) हा गंभीररीत्या भाजला असून कुणाल अतार (३३) आणि रितेश भुत (२५) हे जखमी झाले आहे. रविवारी मध्यरात्री प्रेम वाघेला आणि अजय वाघेला हे दोघे भाऊ इतर तीन मित्रांसह आय २० या मोटारीने दक्षिण मुंबईत जेवायला गेले होते. सोमवारी पहाटे ते मानखुर्द येथे परतत असताना भरधाव मोटार सायन पुलाच्या अलीकडे दुभाजकावर धडकली. त्यानंतर मोटारीने पेट घेतला.

(हेही वाचा – Ganesha Idol : गणेशमूर्तीवरील शिक्के अमान्य , पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नोंदवला महापालिकेकडे आक्षेप)

या अपघाताची माहिती मिळताच सायन पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत जखमींना मोटारीतून बाहेर काढले. उपचारासाठी त्यांना सायन रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी प्रेम व अजय या दोघांना तपासून मृत घोषित केले. तर, इतर तिघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिघांपैकी हरीश कदम हा गंभीररीत्या भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी सायन पोलिसांनी प्रथम अपघाती मृत्यूची नोंद केल्यानंतर दुपारी मोटार चालवत असणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.