Digital hording च्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे कारण?

150
Digital hording च्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे कारण?
Digital hording च्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे कारण?

मुंबईतील रस्त्यावर लावण्यात आलेल्या डिजिटल होर्डिंग (Digital hording) प्रखर प्रकाशामुळे वाहन चालकाना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल मुंबई पोलिसांकडून घेण्यात आली आहे. मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेल्या मोठंमोठ्या डिजिटल होर्डिंग (Digital hording) मालकावर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली असून पहिला गुन्हा विमानतळ पोलिसांनी दाखल केला आहे, यामध्ये ४ होर्डिंग मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

(हेही वाचा – Kalyan Ganja Smuggler: विना तिकीट म्हणून पकडलं, निघाला गांजा तस्कर; उच्च शिक्षित तरुण पोलिसांच्या जाळ्यात)

मुंबईतील पूर्व तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात डिजिटल होर्डींग (Digital hording) लावण्यात आले आहे, ४० फूट बाय ४० फुटांच्या डिझिटल होर्डिंग (Digital hording) मध्ये बसविण्यात आलेल्या एलएडी लाईटचा (LED light) प्रखर प्रकाशामुळे रात्रीच्या वेळी वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांना या डिजिटल होर्डिंगमुळे (Digital hording) समोरचे वाहन दिसत नाही, या मुळे भविष्यात भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या होर्डिंगच्या प्रकाशाचा त्रास चालकांच्या तसेच इतर प्रवाशाच्या डोळ्यावर होत आहे, या सर्व बाबीचा विचार करता मुंबई पोलिसांनी प्रथम डिजिटल होर्डिंग (Digital hording) मालकांना या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या होत्या, त्यानंतर देखील होर्डिंग मालकांनी या सुचनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

(हेही वाचा – ठाण्यात फेरीवाल्यांमध्ये Bangladeshi infiltrators चा सुळसुळाट; धक्कादायक अनुभव वाचाच…)

वाकोला वाहतूक विभागाने दोन दिवसांपूर्वी विलेपार्ले (Vileparle) येथील हॉटेल सेंटॉर या ठिकाणी लावण्यात आलेल्या ‘मंत्राय मीडिया एंटरटेनमेंट’ तसेच बिएनएच ट्रेडर्स (BNH Traders) यांच्या मालकीच्या ४० फूट बाय ४० फूट असलेल्या डिजिटल होर्डींग (Digital hording) मालकांवर विमानतळ पोलीस ठाण्यात प्रखर प्रकाशीत आणि चलचित्र स्वरूपात प्रसिध्द करून मा. पोलीस सह आयुक्त, वाहतुक, बृहन्मुंबई यांनी नमुद जाहिरात फलकासाठी दिलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रामधील अटी व षर्तीचे उल्लंघन केले असुन भारतीय न्याय संहिता २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई संपूर्ण मुंबईभर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.