Parliament Attack : संसदेत घुसखोरी करणाऱ्यांवर UAPA अंतर्गत खटला दाखल

174
संसदेत घुसखोरी (Parliament attack) करणाऱ्या ४ आरोपींची पोलिसांनी १५ दिवसांची कोठडी मागितली होती, पण पटियाला हाऊस न्यायालयाने सात दिवसांची कोठडी मंजूर केली. गरज भासल्यास रिमांड वाढवता येईल, असेही सांगण्यात आले आहे. फिर्यादीने अटक केलेल्या चार जणांवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा अर्थात UAPA अंतर्गत खटला दाखल झाला आहे. या चौघांनीही भीती निर्माण करण्यासाठी हे कृत्य केल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.

भीती निर्माण करण्यासाठी केले कृत्य 

विशेष म्हणजे, या प्रकरणात ललित झा मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात असून, तो अद्याप फरार आहे. सध्या पोलिसांनी आरोपींचे फोन जप्त केले असून, तपास सुरू आहे. तसेच, लोकसभेच्या आत आणि संसदेबाहेर फोडण्यात आलेले स्मोक कँडल  (Parliament attack)  कुठून खरेदी केले, याची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. 13 डिसेंबर रोजी संसदेवर 2001 मध्ये झालेल्या हल्ल्याला  (Parliament attack) बावीस वर्षे पूर्ण झाली. त्याच दिवशी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोघांनी लोकसभेच्या सभागृहात उडी मारली आणि सभापतींच्या खुर्चीकडे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी स्मोक कँडल फोडून सर्वत्र धूर केला. या दोघांनाही खासदारांनीच पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे सभागृहात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याशिवाय, इतर दोघांनी संसदेबाहेरही अशाच प्रकारचे स्मोक कँडल फोडले आणि हुकूमशाही चालणार नाही, अशा घोषणा दिल्या.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.