गुंतवणूकदारांना ‘मोजोनाईट’ हा खडा खरेदी करून गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर आठवड्याला ६ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची १३ कोटी ४८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात (Shivaji Park Police Station) टोरेस ब्रँड चालविणारी प्लॅटिनम हर्न प्रा. लि. ही कंपनी, तसेच कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे (Sarvesh Ashok Surve) यांच्यासह पाच जणांविरुद्ध फसवणूक, तसेच महाराष्ट्र ठेवीदाराच्या हितसंबधाचे संरक्षण अधिनियम कायदा (एम.पी.आय.डी.ॲक्ट) कलम ३,४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर (Shivaji Park Police Station) गर्दी केली असून त्यांच्या तक्रारी नोंद करून घेण्यात येत आहेत. फसवणूक झालेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Investment Scam)
ठाणे, मीरा रोड, नवी मुंबई या येथे या कंपनीच्या शाखा असून संबंधित पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांनी गर्दी केली आहे. संबंधित पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती एका अधिकारी यांनी दिली. गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचा आकडा ५०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दादर पश्चिम येथील जे.के. सावंत मार्गावर टोरेस वास्तु सेंटर इमारतीत ‘टोरेस ब्रेड’ चालविणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रा. लि. या कंपनीचे शो-रूम आणि कार्यालय आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रियाझ उर्फ जॉन कारटर तसेच कंपनीच्या जनरल मॅनेजर तानिया कॅसातोवा आणि कंपनीची स्टोअर इंजार्च व्हॅलेंटीना कुमार यांनी गुंतवणूकदारांना ‘मोजोनाईट’ हा खडा खरेदी केल्यावर गुंतवणूक रक्कमेवर आठवड्याला ६ टक्के प्रमाणे ५२ आठवडे परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून हजारो गुंतवणूकदारांनी या कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. (Investment Scam)
(हेही वाचा – BMC : बोरीवली, भायखळ्यातील बांधकामांना पुन्हा सुरुवात, महापालिकेने उठवली स्थगिती)
शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात (Shivaji Park Police Station) दाखल झालेल्या गुन्ह्यातील तक्रारदार हा दादर येथील भाजीपाला होलसेल विक्रेता आहे, हा विक्रेता खार येथे राहणारा असून त्याने त्याचे आणि त्याच्या नातेवाईक, मित्र, त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचारी तसेच तक्रारदार यांच्या माहितीतील लोक असे एकूण ४० जणांनी जून २०२४ मध्ये प्लॅटिनम हर्न प्रा. लि. या कंपनीत जवळपास १३ कोटी ४८ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. प्रत्येक आठवड्याला कंपनीकडून परतावा बँक खात्यात जमा होत होता, मात्र अचानक डिसेंबर २०२४ पासून आठवड्याला येणारा परतावा बंद झाला, तक्रारदार यांनी १ जानेवारी २०२५ रोजी दादरच्या शोरूम चौकशी केली असता बँकेत टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे या आठवड्यात रक्कम जमा झाली नाही, पुढच्या आठवड्यात दोन्ही रकमा एकत्र जमा करण्यात येईल असे तक्रारदार यांना सांगण्यात आले. (Investment Scam)
दुसऱ्या आठवड्यात तक्रारदार आणि इतरांच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्यामुळे तक्रारदार यांनी ६ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता कंपनीचा सुपरवायझर अबरार शेख याला संपर्क साधला असता ‘थोडा गडबड हो गया आप आ जावो’ असे अबरारने सांगितले असता तक्रारदाराने दादरच्या शोरूम कडे धाव घेतली असता शोरूमच्या बाहेर अनेक गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती. तक्रारदाराने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, टोरेस या कंपनीत १ लाख २५ हजार गुंतवणूकदार असून त्यांची जवळपास शेकडो कोटीची फसवणूक झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community