Crime : वाडीया रुग्णालयात नवजात शिशूंची अदलाबदली, डॉक्टर आणि परिचारिकेविरोधात गुन्हा दाखल

131
GST Return Scam: १७५ कोटींचा जीएसटी परतावा घोटाळा, जीएसटी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
GST Return Scam: १७५ कोटींचा जीएसटी परतावा घोटाळा, जीएसटी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

परळच्या वाडिया रुग्णालयात नवजात शिशूंची अदलाबदली झाल्याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात डॉक्टर व परिचारिकेविरोधात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

ही घटना जून महिन्यात घडली. या प्रकरणी तपास सुरू झाला आहे तसेच अदलाबदली झालेल्या मुलांची आणि त्यांच्या पालकांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. एका मुलगा झालेल्या कुटुंबाने त्यांच्याकडे मुलगी सोपवण्यात आल्याचा दावा केला आहे.

(हेही वाचा – Grant Road Building Fire : बहुमजली इमारतीला भीषण आग )

सुनिता गनजेजी (४१) यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, वाडीया रुग्णालयात ७ जून रोजी मी बाळाला जन्म दिला. माझी प्रसूती रात्री ९.३० ते ११ दरम्यान झाली. प्रसूती होत असताना मी बेशुद्ध होते. त्यावेळी माझ्या बाळाला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यावेळी माझे बाळ बदलण्यात आले. मी खासगी लॅबमध्ये जाऊन डीएनए चाचणी केली. तेव्हा बाळाचा आणि माझा डीएनए जुळला नाही, अशी तक्रार गनजेजी कुटुंबियांनी पोलिसांकडे केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून डॉक्टर आणि नर्सविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गनजेजी यांनी बाळाला जन्म दिला तेव्हा उपस्थित असलेल्या सर्वांचे जबाब नोंदवण्यात आले होते. दाम्पत्य आणि मुलाचे डीएनए चाचणीचे नमुने कलिना लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. मुलाला जन्म दिल्याचा तक्रारदाराचा दावा आहे, मात्र मुलाऐवजी तिला मुलगी दिली. तक्रारदार महिलेने रुग्णालय प्रशासनाकडे ऑगस्टमध्ये याबाबत तक्रार केली होती, असे पोलिसांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.