सिनेअभिनेत्यासह २५ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी Sky 69 Energy Drink विरुद्ध गुन्हा दाखल

45
सिनेअभिनेत्यासह २५ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी Sky 69 Energy Drink विरुद्ध गुन्हा दाखल
  • प्रतिनिधी 

सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीसह २५ सेलिब्रिटींची जवळपास दीड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी इंदोर येथील ‘स्काय 69’ (Sky 69 Energy Drink) या एनर्जी ड्रिंक कंपनीच्या मालकासह ५ जणांविरुद्ध मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकिता लोखंडे, आयुष शर्मा, अंकित गुप्ता, कुशल टंडन सह २५ सेलिब्रिटींनी ‘स्काय 69’ या एनर्जी ड्रिंकची जाहिरात केली होती. त्याचे मानधन देण्यात आले नाही तसेच ज्या सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीला त्यांचे कमिशन न देता फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – राज्यातील १८ जिल्ह्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जीकरण करणार; CM Devendra Fadnavis यांची घोषणा)

या प्रकरणात तक्रारदार हे मे. आयमन एंटरटेनमेंट नावाची सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनी चालवतात. त्यांची कंपनी कंपन्यांच्या जाहिरातींसाठी सिने कलाकार आणि सेलिब्रिटी उपलब्ध करून देते. मोबदल्यात या कंपनीला अधिकृत कमिशन मिळते. मध्यप्रदेश इंदोर येथील स्काय 69 ही एनर्जी ड्रिंक (Sky 69 Energy Drink) कंपनीने त्यांच्या एनर्जी ड्रिंकची जाहिरात करण्यासाठी मे. आयमन एंटरटेनमेंट कंपनी सोबत संपर्क साधला होता.

(हेही वाचा – Khalapur मध्ये धर्मांध मुसलमानांचा गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला; सहा आरोपींना अटक, इतरांचा शोध सुरू)

त्यानंतर या कंपनीकडून २५ सिने अभिनेते आणि सेलिब्रिटींकडून स्काय 69 एनर्जी ड्रिंकची (Sky 69 Energy Drink) जाहिरात करून घेतली. त्याचे १ कोटी ४५ लाख रुपयांचे मानधन न देता खोटे धनादेश आणि बनावट ऑनलाईन पेमेंटच्या रिसीट पाठवून मे. आयमन एंटरटेनमेंट या कंपनीसह २५ सिने अभिनेते आणि सेलिब्रिटींची फसवणूक केल्याप्रकरणी मे. आयमन एंटरटेनमेंट कंपनीने स्काय 69 एनर्जी ड्रिंक (Sky 69 Energy Drink) कंपनीचे मालक तानिष छाजेड, मनू श्रीवास्तव यांच्यासह ५ जणांविरुद्ध चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.