पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या महसूल विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला सीबीआयने ताब्यात घेतले आहे. अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड असे अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे पुण्याच्या महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत व्यवहार करण्यात येत होता. यावेळी रामोड यांना ८ लाख रुपये स्वीकारताना सीबीआयने पकडले. सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली सीबीआयची वरील मोठी कारवाई करण्यात आली. सीबीआयने या संदर्भात सापळा रचला होता. मूळ नांदेड जिल्हयातील असलेले रामोड हे आयएएस अधिकारी असून, ते मागील २ वर्षापासून महसूल विभागात अतिरिक्त आयुक्त म्हणून म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर छापेमारी झाल्याने विभागीय आयुक्त कार्यलयात खळबळ उडाली आहे.
(हेही वाचा Mukesh Khanna : नसीरुद्दीन शाह यांना मुकेश खन्नांनी सुनावले; म्हणाले, ‘लव्ह जिहाद’च्या टीममध्ये सामील व्हा)
Join Our WhatsApp Community