- प्रतिनिधी
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने (एसीबी) सीमाशुक्ल विभागाच्या अधिकाऱ्याकडून २० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयचेच पोलीस उपअधीक्षक ए भास्कर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मुंबईचे उपायुक्त आर. के. पांडे यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलीस उपधीक्षक भास्कर आणि इतर तिघांविरुद्ध १० जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
(हेही वाचा – Driving License मिळवणे झाले सोपे! राज्यात ३८ ऑटोमॅटिक Driving Test Track तयार होणार)
सीबीआयकडे (CBI) असलेल्या मार्च २०२३ च्या एका गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक भास्कर यांच्याकडे होता. हा गुन्हा काही सीमाशुक्ल अधिकारी आणि कस्टम क्लिअरिंग एजंट विरुद्ध दाखल असून, कस्टम क्लिअरिंग एजंट हे सीमाशुल्क अधिकाऱ्यांना हाताशी धरून दोन वर्षांहून अधिक काळ परदेशात राहणाऱ्या लोकांचे पासपोर्ट वापरून योग्य सीमाशुल्क न भरता वस्तू बाहेर काढण्यासाठी कलीयरन्स प्रमाणपत्र घेत होते अशी माहिती समोर आली.
(हेही वाचा – Shiv Sena UBT कडून शिवसेनेत भांडणे लावण्याचा प्रयत्न!)
या प्रकरणात पोलीस उपधीक्षकांनी सीमाशुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून २० लाख रुपयांची लाच घेतल्याचे समोर आल्यानंतर उपायुक्तांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सीबीआयच्या (CBI) सूत्रांनी सांगितले आहे. गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी, सीबीआयच्या दिल्ली युनिटने डीवायएसपी बीएम मीणा यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. ते त्यावेळी मुंबईतील बँकिंग सिक्युरिटीज शाखेत होते. एजन्सीच्या स्कॅनरखाली असलेल्या व्यक्तींना दिलेल्या मर्जीच्या बदल्यात मध्यस्थ आणि हवाला चॅनलद्वारे लाच मागितल्याचा आणि स्वीकारल्याचा आरोप केला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community