Odisha Train Accident : बालासोर येथील भीषण रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयचा अहवाल न्यायालयात सादर, वाचा काय आढळले तपासात…

विद्यमान सिग्नल आणि इंटरलॉकिंग इंस्टॉलेशन्सची चाचणी, दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक अशी कोणतीही पावले आरोपींनी उचलली नाहीत

238
Odisha Train Accident : बालासोर येथील भीषण रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयचा अहवाल न्यायालयात सादर, वाचा काय आढळले तपासात...
Odisha Train Accident : बालासोर येथील भीषण रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयचा अहवाल न्यायालयात सादर, वाचा काय आढळले तपासात...

बालासोर (ओडिशा) येथे बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळील लेव्हल क्रॉसिंगवर दुरुस्तीचे काम वरिष्ठ विभागीय सिग्नल आणि दूरसंचार अभियंता यांच्या मंजुरीशिवाय आणि मंजूर सर्किट आकृतीशिवाय करण्यात आले होते, अशी माहिती सीबीआयने भुवनेश्वर येथील विशेष न्यायालयात दिली आहे. 2 जून रोजी बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकावर कोरोमंडल एक्स्प्रेसचा एका थांबलेल्या मालगाडीला अपघात झाला आणि तिचे काही रुळावरून घसरलेले डबे यशवंतपूर-हावडा एक्सप्रेसला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 296 लोक ठार झाले होते, तर 1,200 हून अधिक लोक जखमी झाले होते.

(हेही वाचा – ADITYA L 1 : इस्त्रोचे आदित्य-एल-1 मिशन २ सप्टेंबरला लाँच होणार)

अपघाताचे एक कारण म्हणजे बहनगा बाजार स्थानकाजवळील लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 94 वर वरिष्ठ विभाग अभियंता अरुण कुमार यांनी केलेले दुरुस्तीचे काम असल्याचा आरोप सीबीआयने भुवनेश्वर येथील विशेष न्यायालयासमोर केला होता. महंता दुसर्‍या एलसी गेट क्रमांक 79 चे सर्किट डायग्राम वापरत आहेत, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

‘पर्यवेक्षणाचे काम इतर काही व्यक्तींवर सोपवण्यात आले होते, त्यामुळे मी अपघाताला जबाबदार नाही’, अशा शब्दांत महंता यांनी आरोपांचे खंडन केले आहे. KM 255/11-13 येथील LC गेट क्रमांक 94 नीट काम करत नसल्याचा दावा करून महंता उच्च अधिकार्‍यांनी त्यासाठी सक्रिय कारवाई केली नाही, असा आरोप महंता यांनी केला आहे.

याविषयी ‘बहनगा बाजार रेल्वे स्थानकाच्या उत्तर गूमटी येथे वायरिंगचे काम सुरू असताना, लेव्हल क्रॉसिंग गेट क्र. 94 चे ऑपरेशन 110 व्होल्ट एसी वरून बदलण्यासाठी दुसर्‍या एलसी गेट क्र. 79 चा ठराविक सर्किट डायग्राम 24 व्होल्ट डीसी पर्यंत वापरला जात होता. मॅन्युअल नुसार सध्याच्या आरोपीने विद्यमान सिग्नल आणि इंटरलॉकिंग इंस्टॉलेशन्सची चाचणी, दुरुस्ती आणि बदल मंजूर योजना आणि सूचनांनुसार आहेत, हे तपासायचे असते’, असे सीबीआयने न्यायालयासमोर सादर केले आहे.

बालासोर तिहेरी रेल्वे अपघात प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात सीबीआयने महंता आणि इतर दोन रेल्वे अधिकाऱ्यांना 7 जुलै 2023 रोजी अटक केली होती. सीबीआयने प्रथमदर्शनी सादर केलेली तथ्ये पाहून भुवनेश्वरमधील विशेष सीबीआय न्यायालयाने अलीकडेच महंता यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. “विद्यमान सिग्नल आणि इंटरलॉकिंग इंस्टॉलेशन्सची चाचणी, दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक अशी कोणतीही पावले आरोपींनी उचलली नसल्यामुळे ही दुर्घटना घडली आणि या अपघातात 296 हून अधिक प्रवासी मरण पावले आणि अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले,” असे न्यायालयाने सीबीआयने सादर केलेल्या अहवालाचा हवाला देत नमूद केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.