सैन्यासाठी स्फोटके बनविणाऱ्या सोलर कंपनीवर सायबर हल्ला! सीबीआय करणार तपास

182

भारतीय सैन्यासाठी स्फोटके बनवणाऱ्या नागपुरातील सोलर ग्रुपवर सायबर हल्ला झाला असून, याप्रकरणी नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे महत्त्वाची बैठक झाली. यात विविध तपासयंत्रणांचे अधिकारी सहभागी झाले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे प्रकरण राष्ट्रीय यंत्रणांशी संबंधित असल्यामुळे इतर एजन्सीज देखील तपासात सीबीआयला सहकार्य करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

( हेही वाचा : WPL 2023 : महिला आयपीएलचा पहिला हंगाम! ४६६९.९९ कोटींचे असे असतील ५ संघ )

नागपुरातील सोलर ग्रुप ही कंपनी भारतीय सैन्यासाठी ‘मल्टीमोड ग्रेनेड्स’ बनविते. सोलर ग्रुपवर मागील आठवड्यात सायबर हल्ला झाला. हॅकर्सने त्यात कंपनीचा महत्त्वाचा डेटा चोरला. त्यात कंपनीच्या माहितीसह संरक्षण विषयक माहिती आणि ड्रॉईंग्जचा समावेश होता. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना सूचना दिली व तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल याचा तपास सुरू केला. कंपनीवर ‘ब्लॅक कॅट’ नावाच्या नावाच्या हॅकर्स ग्रुपने हा हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या घटनेनंतर सोलर ग्रुपचे संकेतस्थळदेखील बंद झाले असून ‘साईट अंडर मेन्टेनन्स’ असा संदेश येत आहे.

सायबर सुरक्षेबाबत सतर्कता आवश्यक

माहिती- तंत्रज्ञान कायदाचे जाणकार ऍड्. महेंद्र लिमये यांनी सांगितले की, शासकीय संस्था आणि संवेदशील माहिती हाताळणाऱ्या संस्थांमध्ये सायबर सिक्युरिटीबाबत जागृक असणे अतिशय आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली एम्सच्या सर्वरवर देखील सायबर अटॅक झाला होता. हल्ली माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वप्रकारचा डेटा अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील असतो त्यामुळे प्रत्येकाने याबाबत दक्षता घेणे क्रमप्राप्त ठरते. ज्या कंपन्यांनी अतिशय छोटेखानी स्वरूपात सुरूवात करून नंतर विस्तार केलाय अशा कंपन्यांमध्ये सायबर सुरक्षेसंदर्भात अपेक्षित सजगता दिसून येत नाही. या कंपन्यांनी वेळोवेळी सायबर सिक्युरिटी ऑडिट करणे आवश्यक असते. तसेच संवेदनशील कंपन्यांमध्ये चीफ इन्फर्मेशन ऑफिसरची नियुक्ती देखील गरजेची असल्याचे ऍड. लिमये यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.