तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. रविवार ११ सप्टेंबर रोजी भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानुसार नायडू यांना १४ दिवस राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येणार होते. मात्र आता चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजयवाडाच्या एसीबी कोर्टाने चंद्राबाबू नायडू यांची कोठडी ५ ऑक्टोंबरपर्यंत वाढवली आहे. कौशल विकास घोटाळ्याप्रकरणी चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली होती.
(हेही वाचा – Asian Games 2023 : चीनला नमवत भारताची सुवर्ण कामगिरी; १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई)
चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्यात मुख्य सूत्रधार असल्याचे आंध्र प्रदेश पोलिसांनी म्हंटले होते. या कथित घोटाळ्यामुळे आंध्र प्रदेश सरकारचे ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अटक केल्यानंतर माजी मुख्यमंत्री नायडू यांना शनिवार १० सप्टेंबर रोजी रात्री ३:४० वाजता वैद्यकीय तपासणीसाठी विजयवाडा येथील शासकीय सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. याअगोदर त्यांची (Chandrababu Naidu) कुंचनपल्ली येथे सुमारे १० तास चौकशी करण्यात आली.
Vijayawada ACB court extends TDP chief and former CM Chandrababu Naidu’s remand upto October 5th in connection with the alleged skill development scam.
— ANI (@ANI) September 24, 2023
सीआयडी पथकाने माजी केंद्रीय मंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांना शनिवारी ९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता नांद्याल शहरातील ज्ञानपुरम येथील आरके फंक्शन हॉलच्या बाहेरून अटक केली. सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या बसमध्ये झोपलेले असताना चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community