Char Dham Yatra : सावधान! चार धामच्या यात्रेस जाताय? तर ‘ही’ बातमी तुमच्यासाठी

152
Char Dham Yatra : सावधान! चार धामच्या यात्रेस जाताय? तर 'ही' बातमी तुमच्यासाठी
Char Dham Yatra : सावधान! चार धामच्या यात्रेस जाताय? तर 'ही' बातमी तुमच्यासाठी

चार धामची यात्रा (Char Dham Yatra) आयोजित करून भाविकांना सोयी-सुविधा देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार खेड,आंबेगाव आणि मावळ तालुक्यात घडला आहे. भुसावळ येथील एका यात्रा कंपनीने या तीन तालुक्यात मिळून जवळपास ६० भाविकांची फसवणूक केली आहे. (Char Dham Yatra)

यात्रेकरूंपैकी भगवान टेमगिरे, अंकुश कदम, भानुदास गाडे यांनी याबाबत आवाज उठविला आहे. खेड, आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील जवळपास ६० भाविक गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या चार धाम यात्रेला भुसावळ येथील सिद्देश टूर्स अँड ट्रॅव्हल्स मार्फत गेले होते. ही यात्रा ३१ मे ते १४ जून या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. यासाठी संबंधित भाविकांनी प्रत्येकी २२५००/- रुपये जमा केले होते. ६० लोकांचे मिळून १४ लाख दहा हजार रुपये दिले होते. (Char Dham Yatra)

(हेही वाचा –Lok Sabha Adhiveshan : लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद आठ वेळा राहिले होते रिक्त)

यात फॅमिलीसाठी स्वतंत्र रूम,जेवण,बस भाडे आदींचा समावेश होता. परंतु प्रत्यक्ष यात्रेला गेल्यानंतर भाविकां वेगळेच चित्र दिसले. त्यांच्याकडून बहुतांश वेळा अधिकचे पैसे घेण्यात आले किंवा काही ठिकाणी त्यांना स्वतः खर्च करावे लागले. प्रवास करीत असताना अचानक बस थांबवून पुढील खर्चासाठी अधिकची रक्कम मागण्यात आली. ठरलेल्या रकमेपेक्षा जवळपास ८० हजार रुपये अधिकची रक्कम या भाविकांकडून वसुल करण्यात आली.संबंधित भाविकांनी याबाबत यात्रा आयोजकांना वेळोवेळी विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत पैसे द्यावेच लागतील असे सांगितले. आपण एवढ्या लांब आलो आहोत या भावनेतून अपरिहार्यतेमुळे भाविकांनी पैसे दिले. (Char Dham Yatra)

(हेही वाचा –Latur Crime News: धक्कादायक! इंग्रजी शाळेत शिक्षण देता येत नसल्याने आईची मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!)

यात्रा आयोजकांच्या या अवास्तव पैसे मागणीमुळे संबंधित भाविकांनी उत्तर काशी येथे दोन वेळा आणि हरिद्वार येथे एक वेळेस संबंधित यात्रा आयोजकाविरोधात पोलिसात तक्रार दिली असल्याचे टेमगिरे, कदम यांनी सांगितले. भाविकांची अशा प्रकारे सर्व सोयीसुविधायुक्त यात्रेचे आमिष दाखवून लांब नेऊन फसवणूक करणाऱ्या अशा यात्रा कंपनीवर गुन्हा दाखल करावा आणि भाविकांचे जास्तीचे घेतलेले पैसे परत करावे अशी मागणी या भाविकांकडून करण्यात आली आहे. याबाबत कंपनी मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. (Char Dham Yatra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.