‘पीएफआय’च्या ११ जणांविरोधात आरोपपत्र; वकीलही अटकेत

दहशतवादी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याच्या तसेच दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए (NIA) ने प्रतिबंधित पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) तेलंगणातील 11 सदस्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्यांमध्ये दहा जण तेलंगणातील असून, एक आरोपी आंध्र प्रदेशातील आहे. हैदराबाद येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

काय आहे प्रकरण? 

तेलंगणाच्या निझामाबाद जिल्ह्यातील व्हीआय टाऊन पोलिस ठाण्यात हे प्रकरण 4 जुलै रोजी सुरुवातीला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एनआयएने 26 ऑगस्ट रोजी नव्याने गुन्हे दाखल केले होते. आरोपी मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनवत होते आणि भारत सरकार तसेच इतर संस्था आणि व्यक्तींविरुद्ध द्वेष आणि विषाने भरलेल्या भाषणाद्वारे त्यांना पीएफआयमध्ये भरती करीत होते, असे तपासात समोर आले असल्याची माहिती एनआयएच्या प्रवक्त्याने दिली. पीएफआयमध्ये भरती केल्यानंतर मुस्लिम तरुणांना पीएफआयद्वारे आयोजित दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांमध्ये पाठवले जायचे. ही शिबिरे शारीरिक शिक्षण आणि योगासनाच्या वर्गाच्या नावाने चालवली जायची, असे NIA एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले. पीएफआयच्या बेकायदेशीर आणि हिंसक कारवायांच्या प्रकरणात केरळातील एका वकिलाला NIA एनआयएने अटक केली आहे. मोहम्मद मुबारक असे या आरोपीचे नाव असून, तो एर्नाकुलम् जिल्ह्यातील एडवनक्कडचा रहिवासी आहे. या प्रकरणात अटक केलेला तो चौदावा आरोपी आहे.

(हेही वाचा काश्मिरी पोलिसांसाठी वर्ष २०२२ गेले शांतीपूर्ण; २०२३ चे लक्ष्य काय असणार?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here