Bangladeshi Citizen : ८ ते १० हजार रुपयात सरकारी दस्तावेज बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

123
Bangladeshi Citizen : ८ ते १० हजार रुपयात सरकारी दस्तावेज बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Bangladeshi Citizen : ८ ते १० हजार रुपयात सरकारी दस्तावेज बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बोगस आधारकार्डसह शासकीय दस्तावेज तयार करून देणाऱ्या एका टोळीचा चारकोप पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही टोळी पैसे घेऊन बांग्लादेशी नागरिक तसेच बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना सरकारी बोगस कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक करून त्यांच्याजवळून बोगस कागदपत्रे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मोहम्मद अब्दुल खान, मोहम्मद दानिश शेख आणि शिव चंदूबा गुप्ता असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून शिव गुप्ता हा हे आधारकार्ड केंद्र सरकारी कागदपत्रे तयार करण्याचे केंद्र कांदिवली पश्चिम निळकंठ नगरातील लकडावाला एसआरए इमारतीच्या एका खोलीत उघडले होते. शिव गुप्ता याने या कामासाठी एजंट नेमले होते, या एजंटला प्रत्येकी ग्राहकामागे कमिशन देण्यात येत होते अशी माहिती समोर आली आहे. चारकोप पोलिसांचे पथक लकडावाला एसआरए या इमारतीत कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी बोगस आधारकार्ड आणि इतर कागदपत्रे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांकांची गर्दी होती. त्यापैकी बहुतांश लोक हे मालाड मालवणी परिसरातील झोपटपट्टीत राहणारे होते. शिव गुप्ता हा बोगस सरकारी कागदपत्रे, आधारकार्ड तयार करून देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून ८ ते १० हजार घेत होता.

(हेही वाचा – Boxing : ठाणे बॉक्सिंग असोसिएशनच्या स्पर्धेत महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची ‘सुवर्ण’ कामगिरी)

पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार शिव गुप्ता हा मागील अनेक वर्षांपासून बोगस दस्तावेज तयार करण्याच्या व्यवसायात असून त्याच्याकडे आधारकार्ड तयार करण्यासाठी लागणारे संगणक, प्रिंटर, फिंगर स्कॅनर, डोळे स्कॅन करण्याची मशीन, जीपीएस सिस्टीम, यूएसबी मशीन इत्यादी पोलिसांना मिळून आले आहे. घुसखोरी करून भारतात आलेल्या बांगलादेशी नागरिकांना या टोळीने मोठ्या प्रमाणात भारतीय असल्याचे बोगस सरकारी दस्तावेज, आधारकार्ड रेशनिंग कार्ड बनवून दिल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात असून त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.