मनी लॉण्डरिंग केसप्रकरणी अटक करण्याचाक धाक दाखवून तोतया सीबीआय अधिकाऱ्याने एका इसमास ४२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fraud)
(हेही वाचा – Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील प्राचीन चार शिळांना तडे; भक्तांमध्ये चिंता)
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे दि. २ डिसेंबर रोजी घरी होते. त्यावेळी ९१८४६६८१२५९३ या क्रमांकाच्या फोनवरून ‘बोलणाऱ्या त्रितिका शर्मा नाव धारण केलेल्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला, तसेच वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप क्रमांकांवरून व्हिडिओ कॉल, व्हॉईस कॉल व चॅटिंग करणाऱ्या इसमांनी ट्राय व सीबीआय, अंधेरी येथून बोलत असल्याचे भासविले. फिर्यादी इसमास नरेश गोयल यांच्या मनी लॉण्डरिंग केसमध्ये सहभागी असल्याचे सांगून त्या केसमध्ये अटक करण्याचा धाक दाखविला, तसेच ऑनलाईन डिजिटल कस्टडीत ठेवण्याची भीती दाखविली. (Fraud)
(हेही वाचा – २४ वर्षे जमीन ताब्यात ठेवून अधिसूचना नाही; म्हाडा आणि सोलापूर महापालिकेला Bombay High Court ने ठोठावला दंड)
या केसच्या तपासाच्या नावाखाली फिर्यादी यांना त्यांच्या आरोपींनी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्याखात्यातून ४२ लाख ७८६ रुप पाठविण्यास भाग पाडून त्यांच आर्थिक फसवणूक केली. हा प्रक दि. ३ ते ३१ डिसेंबरदरम्या मोबाईल फोन व इंटरनेटद्वारे घडल्या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करीत आहेत. (Fraud)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community