- प्रतिनिधी
हाफकिनमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली दोन जणांची आर्थिक फसवणूक (Fraud) करणाऱ्या एका महिलेविरुद्ध पार्कसाईट आणि वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये एका तरुणीचा आणि तरुणाचा समावेश आहे.
अतुल साठे (२२) हा तरुण विक्रोळी पार्कसाईट परिसरात राहण्यास आहे. बी-कॉमपर्यंत शिक्षण झालेला अतुल हा नोकरीच्या शोधात असताना त्यांच्या एका मित्राची मावस बहीण दर्शना जाधव ही तिच्या मावस भाऊ सुजयला सांगता होती की, तिची मैत्रीण खुशबू उतेकर उर्फ कोटीयन ही हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये कामाला असून ती पैसे घेऊन नोकरी लावून देते, तिने देखील खुशबूला नोकरीसाठी पैसे दिले आहे असे दर्शना मावस भावाला सांगत असतांना अतुल मित्राच्या घरी हजर होता.
(हेही वाचा – वरळीतील जागा MMRC ला कायमस्वरुपी दिली)
अतुलने स्वतःच्या नोकरीसाठी दर्शनाला विचारले असता तिने त्याला खुशबूचा मोबाईल क्रमांक दिला. डोंबिवलीतील अंनतम रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या खुशबू उतेकरला अतुलने कॉल केला असता तिने हाफकिन फायनान्स लोअर परळ येथे इंजिनियर म्हणून नोकरीला आहे, त्या ठिकाणी संगणक ऑपरेटरची जागा असून त्या ठिकाणी १ लाख ४० हजार रुपये भरल्यास दरमहा ३२ हजार पगाराची नोकरी मिळू शकते.
मित्र सुजय आणि मित्राची मावस बहिणीने देखील नोकरीसाठी पैसे भरल्यामुळे अतुल देखील नोकरीसाठी पैसे देण्यास तयार झाला. त्याने खुशबुला नोकरीसाठी पैसे दिले, महिना उलटून ही नोकरी न मिळाल्यामुळे त्याने खूशबुला कॉल केला असता तिने वैती नावाच्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक देऊन त्यांच्याशी बोलून घ्या ते आमचे साहेब आहे. अतुलने वैतीला कॉल केला असता त्याने व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून कंपनीत थोडा प्रॉब्लेम सुरू असून लवकरच नोकरीची ऑर्डर मिळेल असे सांगितले.
(हेही वाचा – Ambadas Danve यांनी पलटी मारली; व्हिडिओ व्हायरल)
काही महिने उलटून ही ऑर्डर न आल्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच अतुलने पैसे परत करण्यासाठी खुशबू आणि वैतीकडे तगादा लावला. परंतु लवकर ऑर्डर निघेल असे सांगून दोघे पैसे देण्यास टाळाटाळ करू लागले. खुशबूने दर्शना आणि आणखी तीन चार जणांकडून नोकरीसाठी पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर अखेर अतुलने पार्कसाईट पोलीस ठाणे आणि दर्शना हिने वरळी पोलीस ठाण्यात खूषबू उत्तेकर विरुद्ध तक्रार दाखल केली. वरळी आणि पार्क साईट पोलीस ठाण्यात खुशबू विरुद्ध फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community