Chembur Firing : सूत्रधार आणि शूटरला अटक; संपत्तीच्या वादातून करण्यात आला होता गोळीबार

72
Chembur Firing : सूत्रधार आणि शूटरला अटक; संपत्तीच्या वादातून करण्यात आला होता गोळीबार
  • प्रतिनिधी 

मुंबईतील चेंबूर येथे बिल्डरवर झालेल्या गोळीबार (Chembur Firing) प्रकरणी मुंबई पोलिसांनी मुख्य सुत्रधारासह शूटरला शुक्रवारी मीरा रोड आणि धारावी येथून अटक केली आहे. हा गोळीबार पूर्ववैमनस्य आणि संपत्तीच्या वादातून करण्यात आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यात बिल्डर थोडक्यात बचावला असून त्याच्या गालाला गोळी चाटून गेल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या हल्ल्याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज खान (५२) अफसर खान (२०) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. फिरोज खान याला मुंबई गुन्हे शाखेने मीरा रोड येथील नया नगर येथून अटक केली असून, शूटर अफसर खान याला परिमंडळ ६ च्या पथकाने धारावी येथून अटक केली आहे. फिरोज हा दादर च्या आदर्श नगर येथे राहणारा असून अफसर काही दिवसांपूर्वी मुंबईत आला होता व दादर कबुतरखाना येथे राहत होता अशी माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली. (Chembur Firing)

New Project 2025 04 11T203223.533

(हेही वाचा – एनआयएला तपासात पूर्ण सहकार्य करू; तहव्वुर राणाच्या चौकशी संदर्भात CM Devendra Fadnavis यांची ग्वाही)

बुधवारी रात्री नवी मुंबई बेलापूर येथे राहणारा बांधकाम व्यवसायिक सदृद्दीन खान हा आपल्या धारावी येथून डिफेडर या आलिशान मोटारीतून घरी जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार फिरोज खान आणि शूटर अफसर खान हे दोघे मोटारसायकल वरून त्याचा पाठलाग करीत होते. दरम्यान चेंबूर डायमंड गार्डन या ठिकाणी सिग्नलवर सदृद्दीन खान याची मोटार थांबताच मोटार सायकलवर मागे बसलेला शूटर अफसर खान याने कमरेला लावलेली पिस्तुल काढून सदृद्दीन खानच्या वाहनावर गोळीबार (Chembur Firing) करून पळ काढला होता. या हल्ल्यात सदृद्दीनच्या गालावर गोळी लागल्याने तो किरकोळ जखमी झाला होता. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी परिमंडळ ६ चे एक पथक तयार करण्यात आले होते. तसेच मुंबई गुन्हे शाखेने देखील एक पथक तयार करण्यात आले होते. परिमंडळ ६ च्या पथकाने या हल्ल्यातील शूटर्स अफसर खान याला धारावी येथून अटक करण्यात आला होता. तर या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार फिरोज खान याला गुन्हे शाखेने नया नगर येथून शुक्रवारी अटक करण्यात आली. (Chembur Firing)

(हेही वाचा – Street Lights : मुंबईत ९५ टक्के रस्त्यांवरील पथदिव्यांचे रुपांतर एलईडीमध्ये)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जखमी झालेला सदृद्दीन खान, आरोपी फिरोज खान आणि शूटर अफसर खान हे तिघे उत्तर प्रदेशातील फतेहपुर येथे राहणारे आहे. हल्ल्यातील कटाचा मुख्य सूत्रधार फिरोज खान आणि जखमी बांधकाम व्यवसायिक सदृद्दीन खान हे बांधकाम व्यवसायात भागीदार होते. या दोघांनी मीरा रोड, कल्याण शिळफाटा येथे जमीन विकत घेऊन डेव्हलपमेंट सुरू केली होती. त्यात त्यांचा वाद होऊन दोघे वेगळे झाले होते. तसेच गावी त्या दोघांमध्ये जुना वाद देखील होता. त्यातून हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्ला करताना मुख्य सूत्रधार फिरोज हा स्वतः मोटारसायकल चालवत धारावी पासून सदृद्दीन खान याचा पाठलाग करीत होता आणि अफसर हा मागे बसला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Chembur Firing)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.