Chhatrapati Shivaji Maharaj Insult : पुन्हा कर्नाटकात झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, काॅंग्रेस सरकारच्या विरोधात संतापाची लाट

357
Chhatrapati Shivaji Maharaj Insult : कर्नाटकातील काॅंग्रेस सरकारचा धर्मद्रोह, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला
Chhatrapati Shivaji Maharaj Insult : कर्नाटकातील काॅंग्रेस सरकारचा धर्मद्रोह, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला

कर्नाटकच्या बागलकोट चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथील काॅंग्रेस सरकारने हटवला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सरकारने केलेल्या या कुकृत्याचा सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. या पुतळ्याला आवश्यक अनुमती नसल्याच्या कारणाने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा ६ फुटी पुतळा कडक पोलीस बंदोबस्तात अर्ध्या रात्री जेसीबीद्वारे हटवला. सरकारच्या या हिंदुद्रोहावर सर्व स्तरांतून संताप व्यक्त होऊ लागल्याने सरकारने कलाम १४४ लागू करून संचारबंदी घोषित केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा वर्ष २०२० मध्ये ‘लायन्स क्लब सर्कल’मध्ये स्थापन करण्यात आला होता. तत्कालीन भाजप नेत्यांकडून या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.

अशाच प्रकारे २० डिसेंबर २०२१ रोजी सदाशिवनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी बेंगळुरू शहर पोलिसांनी कन्नड समर्थक संघटनेच्या ७ जणांना अटक करण्यात आली होती. महाराष्ट्रात कन्नड झेंडा जाळल्याचा सूड घेण्यासाठी आरोपींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काळी शाई लावल्याची कबुली प्राथमिक तपासादरम्यान आरोपींनी दिली होती.

रस्ता रिकामा करण्यासाठी पुतळा हटवल्याचे पोलीस उपायुक्तांचे स्पष्टीकरण !

बागलकोटचे पोलीस उपायुक्त केएम जानकी यांनी या प्रकरणी सरकारच्या वतीने सारवासारव केली आहे. जानकी म्हणाले की, ”पुतळ्याच्या स्थापनेसाठी औपचारिक परवानगी नव्हती. या पुतळ्याप्रमाणेच सार्वजनिक जागांवर उभारण्यात आलेली इतर अनेक अनधिकृत स्मारके पादचाऱ्यांना आणि वाहनांना रस्ता मिळावा, यासाठी रिकामी करण्यात आली आहेत. तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही प्रतिबंधात्मक उपाय लागू केले आहेत. हे आजच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असतील.”

(हेही वाचा – Senate Election : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक स्थगित; आदित्य ठाकरे संतापले)

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धरपकड

या प्रकरणी भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी काँग्रेसच्या हिंदुद्रोही कृत्याचा निषेध केला. निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. याव्यतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जयप्रकाश हक्करकी यांनी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या २४-२५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली. या सर्व कार्यकर्त्यांना समज देऊन सोडण्यात आल्याचे अधीक्षक जयप्रकाश या वेळी म्हणाले.

भाजप नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

हिंदू राजे आणि राष्ट्रीय वीर यांचे पुतळे हटवण्याची सरकारची भूमिका निराशाजनक आहे. भारतात अशी कृत्ये फौजदारी गुन्हा मानली जातात, हे दुर्दैवी आहे. भारतात अशा मान्यवरांच्या पुतळ्यांना परवानगी नसेल, तर ते कुठे उभारायचे ?

– भाजप नेते नारायण भंडगे

अन्यथा काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही – भाजप आमदार नितेश राणे 

जेव्हापासून कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आले आहे, तेव्हापासून सातत्याने हिंदूविरोधी भूमिका घेण्याचे काम चालू आहे. हिंदूंवर हल्ले केले जात आहेत. त्याचबरोबर पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात आहेत. लव जिहाद कायदा रद्द करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बागलकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने रातोरात हटवला गेला. हा लाखो, करोडो शिवभक्तांचा अपमान आहे. याबाबत कर्नाटक काँग्रेस सोडा; पण महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी त्याचबरोबर महाविकास आघाडीतील नेते जे शिवरायांच्या नावाने राजकारण करतात, त्यांनी हा पुतळा परत बसवण्यासाठी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नाही तर महाराष्ट्रात त्यांना फिरू द्यायचे का नाही, याचा विचार सामान्य जनता निश्चित पद्धतीने करेल

कर्नाटकातील काँग्रेसची ही मुजोरी आम्ही सहन करणार नाही – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री हटवला आहे. हा संपूर्ण हिंदुस्थान आणि कोट्यवधी शिवभक्तांचा अपमान आहे. कर्नाटकातील काँग्रेसची ही मुजोरी आम्ही सहन करणार नाही. महापुरुषांचा सातत्याने अपमान करणे हे काँग्रेसचे धोरण झाले आहे. कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानाने स्थापित करावा अन्यथा काँग्रेसला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.