Chhattisgarh Naxalite: गडचिरोलीतील शेवटचे गाव जिथे सूर्यप्रकाशही पोहोचत नाही; तिथे नक्षलवाद्यांचे मोठे लाँच पॅड? 

324
Chhattisgarh Naxalite: गडचिरोलीतील शेवटचे गाव जिथे सूर्यप्रकाशही पोहोचत नाही; तिथे नक्षलवाद्यांचे मोठे लाँच पॅड? 
Chhattisgarh Naxalite: गडचिरोलीतील शेवटचे गाव जिथे सूर्यप्रकाशही पोहोचत नाही; तिथे नक्षलवाद्यांचे मोठे लाँच पॅड? 

नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमांमुळे पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार ही राज्ये माओवादी कारवाईपासून जवळपास मुक्त झाली आहेत. आता सरकार आणि सुरक्षा दलांचे संपूर्ण लक्ष छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागांवर आहे. नक्षलवाद्यांचा सुरक्षित गड मानल्या जाणाऱ्या गडचिरोलीमध्ये महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) आणि C-60 कमांडोंना (C-60 commands) मोठे यश मिळाले आहे. गडचिरोली येथील महाराष्ट्रातील शेवटचे गाव बंदोलीजवळील (Chattisgarth, Bandoli) घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी तळ ठोकल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांच्या 7 टीम आणि सी-60 ने संपूर्ण परिसराला वेढा घातला. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही चकमक दुपारी 12 वाजता सुरू झाली आणि संध्याकाळी 6 वाजता संपली. या चकमकीत 12 कुख्यात नक्षलवादी मारले गेले. गडचिरोली भागातील नक्षलवाद्यांविरोधातील हे मोठे यश आहे. (Chhattisgarh Naxalite)

(हेही वाचा –Dibrugarh Express Train Derail : उत्तर प्रदेशमध्ये एक्स्प्रेसचा भीषण अपघात, रेल्वेचे 10-12 डब्बे रुळावरुन घसरले )

पोलीस पथकाचे नेतृत्व करणारे एसपी नीलोत्पल (SP Nilotpal) म्हणाले की, बुधवारी झालेल्या चकमकीत आम्ही 12 सशस्त्र माओवाद्यांना ठार केले. सर्व मृतदेहांची ओळख पटली आहे. त्यामध्ये टिपागड दलममधील 5 नक्षलवादी आणि चांदगाव कसनसूर दलममधील 7 माओवादी आहेत. एसपी नीलोत्पल पुढे म्हणाले की, 17 जुलै 2024 रोजी उत्तर गडचिरोलीतील सर्व सशस्त्र कॅडरचा खात्मा करण्यात आला. बुधवारच्या कारवाईनंतर उत्तर गडचिरोली नक्षलमुक्त झाल्याचा दावा त्यांनी केला. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, 11 शस्त्रे जप्त करण्यात आली असून, त्यापैकी 7 स्वयंचलित शस्त्रे आहेत. पोलीस पथकाने 3 AK-47, 2 INSAS, 1 कार्बाइन आणि 1 SLR इतर शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला आहे. (Chhattisgarh Naxalite)

(हेही वाचा – हरियाणामध्ये Indi Alliance फुटली)

नक्षलवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते

गडचिरोली परिसरातील बंदोली गावाजवळील घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी तळ ठोकलेल्या जागेची पाहणी केली. जप्त केलेल्या शस्त्रांवरून नक्षलवाद्यांचा काही मोठा गुन्हा करण्याचा कट होता, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी तळ ठोकला असून तेथे बडे नक्षलवादी नेतेही उपस्थित असल्याची माहिती पोलिस पथकाला त्यांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. यानंतर एसपी नीलोत्पल यांनी एक टीम तयार करून संपूर्ण परिसराला वेढा घातला. नक्षलवाद्यांनी अशा भागात आपला तळ बनवला होता, जिथे सूर्यप्रकाशही मोठ्या कष्टाने पोहोचतो. (Chhattisgarh Naxalite)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.