अबुझमद (Abuzamad) येथील कुतुल, फरसाबेदा, कोडामेटा येथील जंगलात (Chhattisgarh News) सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 8 नक्षलवादी ठार झाले आहेत. या चकमकीत एका जवानाचा मृत्यु तर २ जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. कोंडागाव नारायणपूर, दंतेवाडा, कांकेर आयटीबीपी, डीआरजी जवानांनी या भागात दोन दिवसांपासून नक्षल ऑपरेशन सुरू केले होते. मारल्या गेलेल्या माओवाद्यांवर एकूण 38 लाख रुपयांचे बक्षीस होते. (Chhattisgarh News)
(हेही वाचा –Nashik News : नाशिकमध्ये एकाचवेळी डेंग्यू आणि फ्लू रुग्णांमध्ये वाढ!)
अबुझमद हा नारायणपूर, विजापूर जिल्हा आणि दंतेवाडा जिल्ह्यांमध्ये येणारा डोंगराळ, जंगली भाग आहे. भौगोलिकदृष्ट्या अलिप्त आणि मोठ्या प्रमाणात दुर्गम, हा भाग माओवाद्यांच्या कारवायांचा केंद्रबिंदू मानला जातो.
पीटीआयच्या वृत्तानुसार, नारायणपूर, कांकेर, दंतेवाडा आणि कोंडागाव या चार जिल्ह्यांतील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर गेले असताना आज (१५ जून) सकाळी अबुझमद जंगलात ही चकमक झाली. जिल्हा राखीव रक्षक (DRG), स्पेशल टास्क फोर्स (STF) आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) च्या 53 व्या बटालियनचा चार जिल्ह्यांतील जवानांचा समावेश असलेले ऑपरेशन 12 जून रोजी सुरू करण्यात आले होते. (Chhattisgarh News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community