छोटा राजनचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी निलेश पराडकरसह १२ जणांवर गुन्हा दाखल

कुख्यात डॉन छोटा राजनचा वाढदिवस साजरा करणारा गुंड निलेश पराडकरसह १० जणांवर टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पराडकरसह सर्वांना नोटीस पाठविण्यात आली आहे. तिहार तुरुंगात असणारा कुख्यात डॉन छोटा राजन उर्फ राजन निकाळजेचा १३ जानेवारी रोजी वाढदिवस होता. त्यावेळी मुंबईसह अनेक ठिकाणी छोटा राजनचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.

मुंबईतील चेंबूर टिळक नगर हा छोटा राजनचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या बालेकिल्ल्यात १३ जानेवारी रोजी राजन टोळीतील गुंड निलेश पराडकर याने एका कार्यालयात छोटा राजनचा फोटो असलेला केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडिओ आणि छायाचित्राची दखल घेत टिळक नगर पोलिसांनी निलेश पराडकरसह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

निलेश उर्फ आप्पा दिनकर पराडकर आणि त्याचे १० ते १२ सहकारी हे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या विचारसरणीचे व त्याचे हिंसक गुन्हेगारी कृत्याचे उदत्तीकरण करणे, त्याच्यासाठी जाणिवपुर्वक जमाव जमवणे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे हावभाव निर्माण करणे व सदर गोष्टीचे चित्रीकरण करून समाजमाध्यमामध्ये जाणिवपुर्वक प्रसारीत करणे, जेणेकरून समाजात कायदा मानणारा जनसमुदाय भयग्रस्त व्हावा आणि त्यांच्यात असुरक्षिततेची भीतीची भावना निर्माण व्हावी. तसेच सामाजिक ऐक धोक्यात येईल व एकोपा टिकण्यास बाधक होईल या उद्देशाने जाणिवपुर्वक कृत्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

(हेही वाचा – देशात घातपाताचा मोठा कट; राम मंदिर, २६ जानेवारी, जी-२० परिषद दहशतवाद्यांचे लक्ष्य)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here