Kurla Bus Accident प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा !

331
Kurla Bus Accident प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा !
Kurla Bus Accident प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा !

कुर्ला पश्चिमेतील (Kurla Bus Accident) एसजी बर्वे मार्गावरील अंजुमन इस्लाम हायस्कुल समोर सोमवारी (9 डिसेंबर) रात्री बेस्ट बसचे नियंत्रण सुटून भरधाव बसने पादचारी आणि वाहनांना चिरडत एका कमानीवर आदळली. या अपघातात सहा जण ठार तर ४९ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. कुर्ला ते अंधेरी या मार्ग क्रमांक ३३२ बसने वाहने आणि पादचाऱ्यांना चिरडत असताना कुर्ला पश्चिम एस.जी. बर्वे मार्गावर एकच गोंधळ निर्माण होऊन लोक रस्त्यावर सैरावैरा धावत होते. (Kurla Bus Accident)

हेही वाचा-Kurla Bus Accident प्रकरणातील मृत आणि जखमींच्या नावाची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर !

बेस्ट बस चालक संजय मोरे याला रात्री कुर्ला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आज त्याला कुर्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. बेस्ट बस साठी कुर्ला स्थानक (Kurla Station) मार्ग मंगळवारी बंद ठेवण्यात आला असून कुर्ला स्थानकातून सुटणाऱ्या बेस्ट बसेस कुर्ला आगार आणि चेंबूर सांताक्रूझ लिंक रोड येथून सोडण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. (Kurla Bus Accident)

हेही वाचा-Kurla Best Bus Accident : मृतांची संख्या ६, तर ४९ जखमी, बस चालकावर गुन्हा दाखल

कुर्ल्यातील या अपघातामुळे मुंबईकर हादरले आहेत. आता या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असे म्हटले आहे. (Kurla Bus Accident)

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.” असे देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसकडून सांगण्यात आले आहे. (Kurla Bus Accident)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.