पोलीस खबरी आणि आरटीआय कार्यकर्ता चूलबुल पांडे उर्फ गुरू वाघमारे याच्या मारेकऱ्यांना वरळी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुरू वाघमारेची वरळीच्या ज्या स्पा मध्ये हत्या करण्यात आली, त्या स्पा मालकासह तीन जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. मुंबईतील ‘स्पा’ची माहिती काढण्यासाठी वाघमारे हा सतत आरटीआय टाकून स्पा मालकांना त्रास देत होता, तसेच त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळत असल्यामुळे कायमचा काटा दूर करण्यासाठी या हत्येची सुपारी देण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. (Chulbul Pandey Murder Case)
संतोष शेरेगर असे अटक करण्यात आलेल्या स्पा मालकाचे नाव आहे. शेरेगर हा नवी मुंबई सानपाड्यात राहणारा असून त्याने भागीदारीमध्ये वरळी नाका येथे ‘सॉफ्ट टच स्पा’ हे भाडे तत्वावर चालविण्यास घेतले होते. शेरेगर याला वरळी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ताब्यात घेऊन रात्री उशिरा त्याला अटक केली. शेरेगरला गुरुवारी शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ३० जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान मुंबई गुन्हे शाखा कक्ष ५ आणि ३ च्या पथकाने गुरुवारी पहाटे नालासोपारा येथून मोहम्मद फिरोज अन्सारी (२६) याला ताब्यात घेतले असून साकीब अन्सारी आणि इतर दोन जणांना राजस्थान कोटा येथून गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. (Chulbul Pandey Murder Case)
(हेही वाचा – Murder : वरळीतील स्पा मध्ये पोलीस खबऱ्याची निर्घृण हत्या)
विलेपार्ले येथे राहणारा आरटीआय कार्यकर्ता आणि पोलीस खबरी असणारा गुरू वाघमारे उर्फ चूलबुल पांडे याची बुधवारी रात्री वरळी नाका येथील सॉफ्ट टच स्पा मध्ये दोन जणांनी धारदार शस्त्राने हत्या करून पळ काढला होता. स्पा मध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणी समोर ही हत्या करण्यात आली होती. हत्येच्या ८ तासांनी गुरुवारी दुपारी २ वाजता या हत्येची माहिती पोलिसांना देण्यात आली, रात्रभर आणि दुपारी २ वाजेपर्यंत गुरू वाघमारे याचा मृतदेह स्पा मध्येच होता, व मृतदेहाशेजारी तरुणी बसून होती. या हत्येप्रकरणी वरळी पोलिसांनी या तरुणीला आणि स्पा मालक संतोष शेरेगर याला सायंकाळी ताब्यात घेऊन कसून चौकशीत केली असता शेरेगर याने हत्येची सुपारी दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने नालासोपारा येथून मोहम्मद फिरोज याला तर राजस्थान कोटा येथून साकीब अन्सारी आणि इतर दोन जणांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून या संशयितांना मुंबईत आणण्यात येत आहे. मुंबईतील ‘स्पा’ची माहिती काढण्यासाठी वाघमारे हा सतत आरटीआय टाकून स्पा मालकांना त्रास देत होता, तसेच त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळत असल्यामुळे कायमचा काटा दूर करण्यासाठी त्याच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. (Chulbul Pandey Murder Case)