भरधाव वेगात निघालेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) वाहनाने एका रिक्षाला दिली, या अपघातात ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून रिक्षा चालकासह तिघे जण जखमी झाले आहे. गुरुवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात गोरेगाव पूर्व (Goregaon East) येथील उड्डाणपुलावर झाला. याप्रकरणी वनराई पोलिसांनी सीआयएसएफ (CISF) जवाना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे, अटक करण्यात आलेला सीआयएसएफच्या (CISF) जवानाने मद्यप्राशन केले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
(हेही वाचा – MHADA Janata Durbar : म्हाडा उपाध्यक्षांचा चालता-फिरता जनता दरबार; ५ अर्जदारांच्या समस्यांचे तात्काळ निवारण)
एस यादव (S Yadav) असे अटक करण्यात आलेल्या सीआयएसएफच्या (CISF) जवानांचे नाव आहे. यादव हा पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या गोरेगावच्या दिशेने सीआयएसएफच्या स्कॉर्पिओ (Scorpio) या वाहनाने उड्डाणपुलावरून प्रवास करत होता, त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले, आणि स्कॉर्पिओ दुभाजक ओलांडत विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षावर आदळली, या भीषण अपघात रिक्षातून प्रवास करणाऱ्या हाजरा शेख (५५) यांचा मृत्यू झाला असून शायना (२२) आणि शिरीन (१७) या दोन मुली आणि रिक्षा चालक जखमी झाले आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत हाजरा आणि जखमी हे जोगेश्वरी (Jogeshwari) येथे राहणारे असून मुंबईतील नातेवाईकांच्या घरून ईद साजरी करून रिक्षाने घरी जात असताना हा अपघात घडला अशी माहिती पोलिसांनी दिली.
(हेही वाचा – PM Modi in Thailand : बँकॉकमध्ये पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत; भेट म्हणून दिली ‘ही’ वस्तू)
या अपघात प्रकरणी वनराई पोलिसांनी सीआयएसएफच्या (CISF) जवाना विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असता तो मद्याच्या नशेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले की, सीआयएसएफच्या वाहनात आणखी तीघे जण होते ते देखील मद्यधुंद अवस्थेत होते. वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने म्हणाले की यादव यांचे वाहन मालाड पूर्व येथे दुरुस्तीच्या कामासाठी देण्यात आले होते. ते एसयूव्ही घेऊन सांताक्रूझमधील कलिना येथील सीआयएसएफ (CISF) कॅम्पमध्ये परतत असताना वाहनाने ऑटोला धडक दिली. यादववर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 106 (1) (खून न करता सदोष मनुष्यवध) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 (मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community