Crime : कौटुंबिक वादातून दोन कुटुंबात हाणामारी; १ ठार, ४ जखमी

190
Crime : कत्तलीसाठी मुंबईत आणलेल्या २७ म्हशींची सुटका, दोघांना अटक

कुर्ला पूर्व बर्मा सेल पटरी येथे लग्नाच्या वादातून झालेल्या भांडणात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी हत्या, हत्येचा प्रयत्न, दंगलीचा गुन्हा दाखल करून ७ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. (Crime)

अदनान सलीम कुरेशी (२४) असे या हाणामारीत ठार झालेल्याचे नाव असून इमरान सलीम कुरेशी (१९) व आरिफ उमर खान (२९) आणि आसिफ खान (३२) हे जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुर्ला पूर्व कुरेशी नगर येथे राहणारे आसिफ खान याच्या भावाने कुर्ला पूर्व बर्मा सेल रेल्वे लाईन येथे राहणाऱ्या सलमान शेख आणि कुटुंबीयांचा विरोध असताना बहिणी सबा सोबत लग्न केले होते. (Crime)

(हेही वाचा – आधी विरोधी पक्षनेते पद, आता संसदीय पक्षनेते… Congress पुन्हा गांधी घराण्याच्या पायाशी)

दरम्यान, शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आसिफ हा भावाच्या पत्नीचे कपडे घेण्यासाठी तीचा भाऊ सलमान खानच्या घरी गेला होता. त्यावेळी सलमान याने आसिफसोबत भांडण करून त्याला दगडाने मारहाण करून जखमी केले, आसिफ जखमी अवस्थेत घरी गेला असता रात्री १२ वाजता आसिफ त्याचा मामा आणि इतर दोघे भाऊ हे जाब विचारण्यासाठी सलमान खानच्या घरी आले. सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांनी या चौघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अदनान कुरेशी याचा मृत्यू झाला तर इतर चौघे जण गंभीर जखमी झाले. (Crime)

या घटनेची माहिती मिळताच चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले केले. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण करणे, आणि दंगलीचा गुन्हा दाखल करून अमन मोहंमद शमिम खान (२०), मोहंमद अनस युनूस शेक (२८), समा अनस शेख (२८), सना अमन खान (२१), शकील अहमद बाबु रझा शेख (२३), हुसेना बानो युनिस शेख (४९) आणि सलमान मोहंमद शमीम खान यांना अटक करण्यात आली आहे. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.