उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना बॉम्बने उडवण्याची धमकी (Bomb threat) मिळाली आहे. गोरखपूरला लागून असलेल्या बस्ती जिल्ह्यातील गोर पोलीस ठाण्याच्या (Gore Police Station) पोलिसांनी याप्रकरणी गुन्हादेखील दाखल केला आहे. एका व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये (WhatsApp group) हा धमकीचा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर, ‘ग्रुप अॅडमिन’ने ‘एक्स’वर व्हिडिओ पोस्ट करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. (CM Yogi Adityanath)
हेही वाचा-Maharashtra Weather : उन्हाचा कहर वाढला ! तापमान चाळीशीच्या उंबरठ्यावर
गौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगिया गावातील रहिवासी अभिषेक कुमार दुबे यांनी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दिली आहे. ते म्हणाले, आपण ‘सनातन धर्म सर्वोपरी’ या नावाने एक व्हॉट्सअॅप ग्रुप चालवतो. ओपन लिंकद्वारे एक अनोळखी नंबरही ग्रुपमध्ये सहभागी झाला. या नंबरवरून ग्रुपवर एक व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. (CM Yogi Adityanath)
हेही वाचा-Cyber Crime : राज्यात सायबर गुन्हेगारांची संख्या वाढली; वर्षभरात सात हजार कोटींची सायबर लूट
साधारणपणे ११ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दोन लोक बोलताना ऐकू येत आहे. एक व्यक्ती मुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवण्यासंदर्भातत बोलत आहे. तर दुसरा त्याला सहमती दर्शवत आहे. महत्वाचे म्हणजे, या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा चेहराही दिसत आहे. (CM Yogi Adityanath)
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ज्या क्रमांकावरून व्हिडिओ पोस्ट करण्यात आला, त्यावर फोन करून आपण विचारणा केली असता, संबंधित व्यक्तीने तो व्हिडिओ त्यानेच तयार केला असल्याचे कबूल केले आहे. यानंतर, पोलिसांनी गुन्हा दाखल करून यासंदर्भात तपास सुरू केला आहे. (CM Yogi Adityanath)
हेही वाचा-आता खाजगी रुग्णालये औषधांच्या किमतींवर मनमानी करू शकणार नाहीत ; Supreme Court चा आदेश
पासात हा मोबाईल क्रमांक कासगंज जिल्ह्यातील एका व्यक्तीचा असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे प्रभारी पोलिस स्टेशन अधिकारी विनय प्रताप सिंह यांनी सांगितले. (CM Yogi Adityanath)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community