Comedian Sunil Pal Missing : कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता प्रकरणी चार दिवसांनी अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल

210
Comedian Sunil Pal Missing : कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता प्रकरणी चार दिवसांनी अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल
Comedian Sunil Pal Missing : कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता प्रकरणी चार दिवसांनी अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल
कॉमेडियन सुनील पाल यांचे हरिद्वार येथील एका कार्यक्रमा दरम्यान अपहरण करून त्यांच्याकडून ८ लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी शुक्रवारी रात्री ५ ते ६ अनोळखी अपहरणकर्त्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांताक्रूझ पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हा मेरठ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सुनील पाल यांचे  हरिद्वार येथील एका ढाब्यातून अपहरण करून त्यांना दोन दिवस एका ठिकाणी डांबून ठेवत २० लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती, पाल यांनी मित्र आणि नातेवाईकांकडून ८ लाख रुपये खात्यावर मागवून अपहरण कर्त्याना दिले त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली असे पोलिसांनी सांगितले.  (Comedian Sunil Pal Missing)
कॉमेडियन सुनील पाल हे हरिद्वार येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता २ डिसेंबर पासून त्यांच्या कुटूंबियासाठी संपर्क तुटला होता, व अचानक त्यांच्या व्हाट्सअप्प क्रमांकावरून त्यांची पत्नी, नातेवाईक आणि मित्रांना पैशांची मागणी करण्यात आली होती. सुनील पाल यांचे अपहरण झाल्याच्या संशयावरून त्यांच्या पत्नीने मंगळवारी सायंकाळी सांताक्रूझ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली, दरम्यान पोलिसांनी या तक्रारीची शहानिशा करीत असताना रात्री उशिरा सुनील पाल यांच्यासोबत मुंबई पोलिसांचा संपर्क झाला होता, व ते सध्या दिल्लीत असून मुंबईत येण्यासाठी निघाले आहे, आणि नक्की काय प्रकार आहे हे मुंबईत आल्यावर सांगतो असे त्यांनी पोलिसांना सांगितले. (Comedian Sunil Pal Missing)
दरम्यान सांताक्रूझ पोलिसांनी शुक्रवारी पाल यांना पोलीस ठाण्यात बोलावून पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा जबाब नोंदविण्यात आला, पाल यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, त्यांच्यासाठी हरिद्वारमध्ये एक शो बुक करण्यात आला होता. २डिसेंबर रोजी ते मुंबईतून विमानाने हरिद्वारला पोहोचले,  तेव्हा त्यांना घ्यायला आलेल्या गाडीने पाल यांना एका ढाब्याजवळ सोडले आणि तिथे पुन्हा दुसरी गाडी आली आणि त्यांना जबरदस्तीने त्या गाडीत बसवले. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती, तेथून दीड वाहनातून एका अज्ञात स्थळी एका खोलीत नेण्यात आले आणि अपहरणकर्त्यानी पाल यांच्या डोळ्यावरील पट्टी उघडली,तेव्हा अपहरण कर्त्यानी आम्ही किडनॅपर आहोत,असे म्हटले, त्यांनी सुटकेसाठी  २० लाख रुपयांची मागणी केली, अन्यथा जीवे मारून नदीत फेकू अशी धमकी अपहरणकर्त्यानी दिली अशी माहिती पाल यांनी पोलिसांना दिली. जीव वाचवण्यासाठी पाल यांनी त्यांना माझ्याकडे एवढी रक्कम नाही, माझ्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी मी नातेवाईक आणि मित्रमंडळी कडून मागवून देतो असे अपहरणकर्त्याना पाल यांनी सांगितल्यावर अपहरण कर्त्यानी पाल यांना त्यांचा मोबाईल फोन परत करून रक्कम मागविण्यास सांगितली.सुनील पाल यांनी पत्नी, नातेवाईक आणि मित्राना व्हाट्सअप्प वर मेसेज पाठवून खात्यावर पैसे मागविले आणि ८ लाख रुपये अपहरण कर्त्याना देऊन स्वतःची सुटका करून घेतली असे पाल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.  (Comedian Sunil Pal Missing)
अपहरण कर्त्याना रक्कम मिळाल्यानंतर त्यांनी पाल यांना  मेरठच्या रस्त्यावर सोडले.  तिथून त्यांनी  गाझियाबादला एक रिक्षा घेतली आणि मग तिथून दिल्लीच्या काश्मिरी गेटला पोहोचले, तेथून दुसरी रिक्षा घेऊन दिल्ली विमानतळावर गाठले  आणि मुंबईला आलो अशी माहिती सुनील पाल यांनी सांताक्रूझ पोलिसांना दिली. हा सर्व प्रकार हरिद्वार मेरठ येथे घडल्यामुळे सांताक्रूझ पोलिसांनी शून्य एफआयआर नोंदवून अनोळखी अपहरणकर्ता विरुद्ध अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करून हा गुन्हा पुढील तपासासाठी मेरठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. (Comedian Sunil Pal Missing)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.