मुंबई गुन्हे (Mumbai Crime) शाखेने बुधवारी रात्री अंधेरी गावदेवी डोंगरी येथे छापा टाकून अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीला अटक करून त्याच परिसरातुन त्यांची वरात काढण्यात आली, या वराती दरम्यान अमली पदार्थ विक्रते ‘आम्ही ड्रग्स विकायचो, यापुढे आम्ही अमली पदार्थ विकरणार नाही, अशी कबुली देत होते.अमली पदार्थ विक्रेत्याची काढलेली वरातीचा व्हिडीओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्वस्तरातून मुंबई पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
आफताब बेग, मोहम्मद अयान हनीफ शेख, अरबाज करीम तुर्की आणि शेरबाने मोहम्मद हसिम सिद्दीकी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही टोळी मागील अनेक वर्षांपासून अंधेरी पश्चिम गावदेवी डोंगरी, जुहू गल्ली इत्यादी परिसरात अमली पदार्थाची विक्री तसेच तस्करी करीत होती, स्थानिकामध्ये या टोळीची दहशत असल्यामुळे या टोळीच्या विरोधात जाण्यास स्थानिक नागरिक घाबरत होते. या टोळीकडून तरुण पिढी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांना अमली पदार्थाच्या व्यसनात लोटत होती.
(हेही वाचा – Paris Paralympic : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये हरविंदर सिंगला ऐतिहासिक सुवर्ण)
मुंबई गुन्हे (Mumbai Crime) शाखेला अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीची माहिती मिळाली, गुन्हे शाखा कक्ष ९चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक (Daya Nayak) यांच्या पथकाने मागील दोन दिवसापासून या टोळीवर लक्ष ठेवून होते, अखेर बुधवारी रात्री गुन्हे शाखेने अंधेरी पश्चिम गावदेवी येथे छापा टाकून आफताब बेग, मोहम्मद अयान हनीफ शेख, अरबाज करीम तुर्की आणि शेरबाने मोहम्मद हसिम सिद्दीकी या टोळीच्या मुसक्या आवळत, या टोळीची परिसरातुनच धिंड काढण्यात आली.
या दरम्यान या टोळीकडून पोलिसांनी संपूर्ण कबुली घेत ‘ आम्ही ड्रग्स विक्री करायचो, यापुढे ड्रग्सची विक्री करणार नाही, असे जोर जोराने बोलत त्यांची पोलीस ठाण्यापर्यंत चालत धिंड काढण्यात आली. गुन्हे शाखेच्या या कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले तसेच मुंबई पोलिसांचे कौतुक करण्यात येत होते.
या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला, आणि संपूर्ण स्तरातून मुंबई पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. मुंबई पोलिसांनी ज्या पद्धतीने ड्रग्स माफियावर कारवाई केली त्याच पद्धतीने संपूर्ण राज्यभरात ड्रग्स माफिया, तसेच सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोशल मीडियावर लोकांकडून होत आहे. (Mumbai Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community