रेल्वे घातपाताचा कट देशद्रोहाचे कृत्य ठरणार! Central Government रेल्वे कायद्यात दुरुस्ती करण्याच्या तयारीत

42
रेल्वे घातपाताचा कट देशद्रोहाचे कृत्य ठरणार! Central Government रेल्वे कायद्यात दुरुस्ती करण्याच्या तयारीत
रेल्वे घातपाताचा कट देशद्रोहाचे कृत्य ठरणार! Central Government रेल्वे कायद्यात दुरुस्ती करण्याच्या तयारीत

गेल्या दोन महिन्यांत रेल्वेचा घातपात (train accident) करण्याचे २० पेक्षा जास्त प्रयत्न समोर आले आहेत. अनेक राज्यांत रुळांवर अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. रेल्वेच्या रुळांवर लोखंडी रॉड, बोल्डर, सिलिंडर इत्यादी ठेवून घातपाताचे प्रयत्न उजेडात आले आहेत. त्यामागे दहशतवाद्यांचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच सरकारने (Central Government) त्याबाबत कठोर पावले उचलली आहेत. ताज्या घटनांचा तपास पोलिस, गुप्तचर यंत्रणा याव्यतिरिक्त एनआयए देखील करत आहे.

(हेही वाचा-Tirupati Prasadam : सरकारने मंदिरे हिंदू मंडळाच्या अखत्यारीत आणावीत; धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे आवाहन)

तपासातून मिळालेल्या इनपुटनंतर रेल्वेने सतर्कता वाढवली आहे. गुप्तचर विभागालादेखील इशारा दिला आहे. आता रेल्वे घातपाताचा कट करणाऱ्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल. त्यासाठी रेल्वे अधिनियमांत दुरुस्ती केली जाणार आहे. याविषयीची अधिसूचना लवकरच जाहीर होऊ शकते. सद्यस्थितीत रेल्वे अधिनियम-१९८९ च्या कलम १५१ अंतर्गत रेल्वे दुर्घटनेचा कट सिद्ध झाल्यास कमाल दहा वर्षांची शिक्षा व दंडाची तरतूद आहे. आता या अधिनियमांत उपकलम जोडून त्यास देशद्रोहाच्या श्रेणीत आणण्याची तयारी केली जात आहे. (Central Government)

(हेही वाचा-Data Scientist Salary : डेटा सायन्टिस्ट होऊन तुम्ही महिन्याला ‘इतके’ रुपये कमावू शकता )

रुळावर अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न हा कट आहे. यातून दुर्घटना घडल्यास प्राणहानी होते. आता आरोपीच्या विरोधात सामुहिक हत्येचे कलमही लावले जाऊ शकते. त्यात जन्मठेपेपासून मृत्यूदंडापर्यंतची तरतूद असू शकते. त्यावरून कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. लवकरच ते जाहीर केले जातील. (Central Government)

रेल्वे इंजिनावरही कॅमेरे लागणार?
रेल्वे बोर्डाचे एक अधिकारी म्हणाले, “रुळावर अडथळा आणण्याच्या कटावर तोडगा काढण्यासाठी निवडक प्रवासी गाड्यांना संवेदनशील भागातून पाठवण्याआधी पायलट लोको चालवली जाते. सोबतच रेल्वे रुळावर पोलिस, गँगमनचे निरीक्षण वाढवले आहे. रेल्वे संवेदनशील भागात कॅमेरेही बसवणार आहे. रेल्वे इंजिनावरही कॅमेरे लावण्याची योजना आहे. यातून रिअल टाइम निगराणी होईल. यातून रुळावरील घातपाताचे प्रयत्न आधीच रोखता येतील.” (Central Government)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.